जळगाव । जिल्हा कारागृहातील पोलीस शिपाई राम घोडके यांच्यावर कैद्याने लोखंडी पत्राने प्राणघातक हल्ला केला. नंतर कैद्याने स्वत:वरही हा करून घेत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सचिन दशरथ सैंदाणे असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत असे की, जळगाव जिल्हा कारागृहात पोलीस शिपाई राम घोडके हे सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर, रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे हे बुधवारी सायंकाळी ६ वाजता बॅरेकमध्ये जाऊन कैद्यांची अंगझडती घेत होते. यादरम्यान एका बॅरेकमध्ये कैदी सचिन दशरथ सैंदाणे याची अंगझडती घेण्यासाठी गेले. त्याने अंगझडतीत विरोध करत कर्मचाऱ्यांना अरेरावी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर लोखंडी पत्रा कर्मचाऱ्याला मारत स्वत:च्या डोक्यात पत्र्याने वार करून घेतले व दुखापत केली. घटनेची माहिती मिळाल्यावर सर्कल जेलर एस.पी पवार यांनी कारागृहात भेट दिली तसेच गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले.
हे देखील वाचा :
सर्दी-खोकल्यावर मध आहे रामबाण उपाय, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
TMC खासदार नुसरत जहाँने ओलांडली हॉटनेसची हद्द, दिली बोल्ड पोझ
युक्रेन-रशिया तणावामुळे गोल्ड-क्रूडसह अनेक वस्तू महागल्या
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विविध पदांची भरती, इतका मिळेल पगार
रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा, तात्काळ लाभ घ्या
याप्रकरणी पोलीस शिपाई राम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैदी सचिन सैंदाणे याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सैंदाणे हा शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात २५ सप्टेंबर २०१६ पासून जळगाव जिल्हा कारागृहात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान कारागृहातील या घटनेने खळबळ उडाली आहे.