यावल : सध्या आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात एका २१ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ललीत उर्फ लक्ष्या वासूदेव कोळी (वय २१, रा. चिंचोली ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव असून ही घटना यावल तालुक्यातील चिंचोली येथे घडलीय. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, चिंचोली येथे राहणार ललीत कोळी हा सोमवारी दुपारी गुरांना चारा टाकून येतो असे सांगून घरातून शेतात गेला होतो. ललीत हा रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोधाशोध केला असता मिळून आला नाही. दरम्यान गावातील मयुर सुभाष कोळी हा मंगळवारी ८ फेब्रुवारी ललीत कोळी यांच्या कासारखेडा शिवारातील शेतात गेले असतां एका लिंबाच्या झाडाला ललीत कोळी याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
नोकरीची संधी पुन्हा मिळणार नाही? बँकेत पदवी पाससाठी मोठी पदभरती
काँग्रेस नसती तर…पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा
फ्लिपकार्टची महालूट ऑफर! 50-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत
संजय राऊतांनी भाजपबद्दल केलेल्या त्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
















