यावल प्रतिनिधी । १५ वर्षीय अल्पवयीन गावातील दोन अल्पवयीन मुलांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुलांनी यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले.
हे सुद्धा वाचा :
Jio चा धासू प्लॅन! कमी किमतीमध्ये मिळेल दररोज 1GB डेटासह बरंच काही
पार्टनरने रागात व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलेय? अशा प्रकारे अनब्लॉक करा
.. तर ‘या’ एका चुकीमुळे रेल्वेत नोकरी मिळण्यावर आजीवन बंदी लागू शकते
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगीने घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता धाव घेवून दोन्ही संशयित आरोपींविरोधात तक्रार दिली. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून गावातील दोन अल्पवयीन मुलांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.