नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या असतील, परंतु त्यानंतरही असे प्लान्स आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे, परंतु फायदे जबरदस्त मिळत आहेत. जर तुम्हीही कमी दिवसांचा प्लान शोधत असाल तर आम्ही तुम्हाला 150 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लानबद्दल सांगणार आहोत. याशिवाय आणखी दोन प्लॅन आहेत, ज्यांची किंमत 150 रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला Jioच्या अशा तीन प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे Airtel आणि Viच्या प्लॅनपेक्षाही चांगले आहेत.
जिओचा 149 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 1 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 20 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचा प्रवेश देखील उपलब्ध आहे.
जिओचा १५२ रुपयांचा प्लॅन
जिओचा हा प्लान जिओ फोन यूजर्ससाठी आहे. 152 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 0.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 14 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचा प्रवेश देखील उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा :
पार्टनरने रागात व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलेय? अशा प्रकारे अनब्लॉक करा
.. तर ‘या’ एका चुकीमुळे रेल्वेत नोकरी मिळण्यावर आजीवन बंदी लागू शकते
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
जिओचा १७९ रुपयांचा प्लॅन
जिओच्या १७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २४ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 1 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 24 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचा प्रवेश देखील उपलब्ध आहे.