Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या कामांना गती : ५ हजार ५७ शेतकऱ्यांना होणार वीजपुरवठा !

najarkaid live by najarkaid live
May 28, 2019
in राज्य
0
उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या कामांना गती :  ५ हजार ५७ शेतकऱ्यांना होणार  वीजपुरवठा !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,दि.२८ – राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने जाहिर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणालीचे कामे आता प्रगतीपथावर असून आतापर्यंत सुमारे ५ हजार ५७ शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. 
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे २०१७ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या  या अभिनव संकल्पनेला ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व  महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या योजनेला गती दिली. त्यानुसार मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी सरासरी २ लाख ५० हजार रूपयांचा अंदाजित खर्च येणार असून २.५० लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या ३३ हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्याकरिता ५ हजार ४८ कोटींचा खर्च होणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी  प्रामुख्याने १० व १६ केव्हीएचे सुमारे १ लाख ३० हजार इतक्या मोठ्या प्रमाणात रोहित्र लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान व साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत थोडा विलंब झालेला आहे.

राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या  या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. या प्रणालीचे कामे जलद व उच्चदर्जाची व्हावीत यासाठी महावितरणने देशभरातील नामांकित कंपन्यांना आवाहन केले असून व्होल्टाससहित नामांकित कंपन्यांनी प्रणालीच्या निविदांना मोठा प्रतिसाद दिला आहे. ही योजना फूल-ट्रंकी व पार्शियल-ट्रंकी  अशा दोन प्रकारे राबविण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये महावितरण रोहित्रे देणार असून उर्वरित कामे एजन्सींना करावयाची आहेत. यामध्ये ६००  एजन्सींना कामे मिळाली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रोहित्रांसह १०० टक्के कामे एजन्सीना देण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-२०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन  महावितरणने केले आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळणार असून १ किंवा २ शेतकऱ्यांसाठी  समर्पित रोहित्र राहील. शेतकऱ्यांमध्ये रोहित्राप्रती स्वामित्वाची भावना राहणार असून शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल. लघू व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी या योजने अंतर्गत सिंचनाची उद्दिष्टपूर्ती साधता येईल. तसेच रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होऊन तांत्रिक व वीजहानीचे प्रमाण कमी होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न

Next Post

मला कोणत्याही मंत्रिपदाचा कार्यभार देऊ नये – अरुण जेटली यांचे पंतप्रधानांना पत्र 

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मला कोणत्याही मंत्रिपदाचा कार्यभार देऊ नये – अरुण जेटली यांचे पंतप्रधानांना पत्र 

मला कोणत्याही मंत्रिपदाचा कार्यभार देऊ नये - अरुण जेटली यांचे पंतप्रधानांना पत्र 

ताज्या बातम्या

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us