मुंबई, (प्रतिनिधी) – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी मुंब्रा रेतीबंदर येथे खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून भाजपा ने या प्रकरणी प्रश्न उपस्थित करत हा मृत्यू हत्या की आत्महत्या असा संशय व्यक्त केला आहे.
आज मनसुख यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यात मृतदेह सापडल्याच्या सुमारे बारा ते चौदा तास आधी मनसुख यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
















