जामनेर – शहरातील श्रीराम मार्केट मधील गाळा नं. ३६ न्यु रेणुका शिलाई मशीन या दुकानातुन दुकानाचे कुलुप तोडुन शटर उचकावुन फिर्यादी ईश्वर सुपडु कव्हाळे, वय – ४२,धंदा – शिलाई मशीन विक्री व दुरुस्ती, रा।शेलवड ता।बोदवड यांचे दुकानातून ९ नविन शिलाई मशीन चोरुन नेल्याची घटना घडली होती . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता .
याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना सदर गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.
३० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो कॉ . विजय शामराव पाटील व पो कॉ . सचिन महाजन यांना गोपनिय माहिती मिळाली की, शेख जफर अब्दुल मुजफ्फर मुळ राहणार – श्रीरामपेठ मदनीनगर, जामनेर हल्ली मुक्काम – खडका रोड,बालाजी तोल काटयाजवळ, भुसावळ याने श्रीराम मार्केट मधील न्यु रेणुका शिलाई मशीन या दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन दुकानातील मशीन चोरल्या आहेत. सदर बातमी प्रमाणे पोलीस निरीक्षक. बापु रोहोम यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेकडील सफौ. अशोक महाजन, पो हे कॉ . सुनिल दामोदरे, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, नंदलाल पाटील , दिपक शिंदे अशाना जामनेर शहरात रवाना केले.
बातमी प्रमाणे पथकाने शेख जफर अब्दुल मुजफ्फर वय – ४५ वर्षे, मुळ राहणार – श्रीरामपेठ मदनीनगर, जामनेर हल्ली मुक्काम – खडका रोड,बालाजी तोल काटयाजवळ, भुसावळ यास ताब्यात घेतले असता त्यांची अधिक चौकशी करता त्यांने सदर गुन्हयातील चोरी केलेले शिलाई मशीन श्रीराम मार्केट जवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे मागील बाजुस मोकळया जागेत कच-यात लपवुन ठेवलेले पंचासमक्ष काढुन दिल्याने त्यास पुढील तपास कामी जामनेर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.
यातील फिर्यादी ईश्वर सुपडु कव्हाळे यांना त्यांचे दुकानातून घरफोडी करून चोरी झालेले शिलाई मशीन सह आरोपी अवघ्या ०९ तासात स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद झाल्याने त्यांचे आनंदाने डोळे पाणावले होते . त्यांनी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे , पोलीस निरीक्षकबापू रोहोम यांचे सह पोलीस पथकाचे आभार मानले .