जळगाव, (प्रतिनिधी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील निवास्थान असलेल्या ‘ राजगृह ‘ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध म्हणून आज जळगांव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जळगाव जिल्हयामध्ये निषेध करताना कोणत्याही कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ नये, याविषयी चर्चा करण्यात आली, निवेदन देताना मुकुंद सपकाळे , दिलिप सपकाळे, भारत ससाणे, अमोल कोल्हे, भारत सोनवणे,संजय तांबे आदी उपस्थित होते.















