जळगावात, (प्रतिनिधी)- येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी दोन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.
दोन्ही कोरोना बाधित रूग्ण हे अमळनेर येथील असून यात एका 17 वर्षीय तरूणाचा तर एका 44 वर्षाच्या पुरूषाचा समावेश असून हे दोन्ही रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या सोळा झाली असून यापैकी एक रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे.
अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.