Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवस्मारकाच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार; शिवस्मारक उभारण्याचा उद्देश हा पैसे खाण्यासाठी असल्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुन्हा आरोप

najarkaid by najarkaid
October 1, 2019
in राज्य
0
शिवस्मारकाच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार; शिवस्मारक उभारण्याचा उद्देश हा पैसे खाण्यासाठी असल्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुन्हा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

कंत्राटदार कंपनीला पैसे दिले नाहीत : चंद्रकांत पाटील
मुंबई – शिवस्मारक उभारण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमासाठी नाहीतर पैसे खाण्यासाठी होता, हे स्पष्ट झाले असून शिवस्मारकाच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
सावंत म्हणाले, एल अँड टी या कंपनीने भरलेल्या 3 हजार 800 कोटी रुपयांच्या निविदेची रक्कम वाटाघाटीद्वारे 2 हजार 500 कोटी रूपयांपर्यंत कमी करण्याला विभागीय लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदवत चौकशीची मागणी केली होती. या प्रकल्पाची निविदेतील किंमत 2 हजार 692 कोटी होती. पंरतु एल अँड टी कंपनीची निविदेतील बोली 3 हजार 826 कोटी म्हणजेच जवळपास 42 टक्के अधिक होती. त्यामुळे खर्‍या अर्थाने या प्रकल्पाची फेरनिविदा होणे आवश्यक होते. परंतु एल अँड टीने आधीच फुगवलेली रक्कम आम्ही वाटाघाटीतून कमी केली आणि शासनाचा फायदा करून दिला असे सरकारकडून भासवले गेले. परंतु यात 1 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम काढण्याचा सरकारचा डाव होता, असे ते म्हणाले. 28 फेब्रुवारी 2018 रोजी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाला मान्यता दिली. त्यानंतर एल अँड टी कंपनीच्या सहमतीसाठी बांधकाम विभागाने पत्र पाठवले. कंपनीने या सर्व गोष्टींचा एका दिवसात अभ्यास करून 1 मार्च रोजी सहमती दर्शवली. आणि त्याच दिवशी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कंपनीला देकारपत्र देण्यात आले.
एल अँड टी कंपनीला लाभ देण्याची घाई-
ही इतकी घाई या सगळ्या घडामोडीतून एल अँड टी कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी होती, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. करारनामा आणि कार्यारंभ आदेश देण्याकरिता मंत्रालयीन पातळीवरून संबंधित अधिकार्‍यांवर दबाव टाकून सह्या घेण्यात आल्या. एकाच वेळी देण्यात येणारा कार्यारंभ आदेश तीन, तीन वेळा देण्याचा चमत्कार केल्याचे मलिक यांनी सांगितले.
कंत्राटदार कंपनीला पैसे दिले नाहीत-चंद्रकांत पाटील
1999 मध्ये सत्तेवर येण्यासाठी शिवस्मारकाबाबत घोषणा करून 15 वर्षे त्याला सोयीस्कर बगल दिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आता भाजप नेतृत्वाखालील सरकारने तत्परनेने केलेल्या कार्यवाहीत दोष काढता येणार नाहीत, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कंत्राटदार एल अँड टी यांना कोणतीही रक्कम अदा करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमध्ये एल अँड टी हे प्रतिवादी नसल्याने मुकुल रोहतगी यांनी या कंपनीची बाजू मांडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार

Next Post

भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; खडसे, तावडे यांचे नाव नाही!

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; खडसे, तावडे यांचे नाव नाही!

भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; खडसे, तावडे यांचे नाव नाही!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us