Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार

najarkaid by najarkaid
October 1, 2019
in राजकारण
0
आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-विधानसभेसाठी महायुती होणार की नाही याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार की नाहीत, याविषयी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, महायुतीसह आदित्य यांच्या निवडणूक लढवण्यावरही सोमवारी शिक्कामोर्तब झाले. ’वरळी मतदारसंघातून मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे’, असे खुद्द आदित्य यांनीच जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरणारे आदित्य हे ’ठाकरे’ कुटुंबातील पहिली व्यक्ती ठरले आहेत.
’आमदार, मुख्यमंत्री बनण्यासाठी किंवा माझे स्वप्न साकार करण्यासाठी नव्हे, तर महाराष्ट्रातील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी, नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी मी राजकारणात प्रवेश करतोय. त्यासाठीच तुम्हा सर्व शिवसैनिकांच्या साक्षीने वरळी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे’, अशी घोषणा आदित्य यांनी केली. वरळीत लाला लजपतराय कॉलेजात शिवसेनेचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी वरळीतून त्यांची उमेदवारी घोषित केली. यावेळी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. आदित्य यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताच शिवसैनिकांनी ’जय शिवाजी, जय भवानी’ आणि ’आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा दिल्या. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन आदित्य यांचे अभिनंदन केले. राजकारणाशिवाय मी काहीही करू शकत नाही. पण, तुमची परवानगी असेल तर शिवरायांच्या आणि सर्व महापुरुषांच्या साक्षीने निवडणूक लढवणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.
’वरळीला जागतिक पातळीवर नेणार-
’वरळीला जागतिक पातळीवर न्यायचे आहे. राजकारणात असल्यास एका निर्णयामुळे तुम्ही लाखो लोकांचे भविष्य घडवू शकता. त्यामुळेच मी निवडणुकीला उभा राहतोय’, असे आदित्य म्हणले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी असल्यानेच निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीदरम्यान माझा प्रचार कराच, पण प्रतिस्पर्धी उमेदवारालाही त्याचा प्रचार करू द्या, असे आवाहन यावेळी आदित्य यांनी शिवसैनिकांना केले. ’सध्या हीच निवडणूक लढवण्याची नेमकी वेळ आहे. महाराष्ट्र कर्जमुक्त करण्याची, प्रदूषणमुक्त करण्याची, बेरोजगारीमुक्त करण्याची हीच ती वेळ आहे. म्हणूनच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी बिनधास्त झेप घेत आहे’, असेही ते म्हणाले. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आदित्य झाले भावूक- जनआशीर्वाद यात्रेनंतर सगळीकडे 40 मिनिटांपेक्षाही जास्त भाषण करण्याची मला सवय झाली. मात्र, आज मला काय बोलायचे ते सुचत नाहीये. म्हणूनच मी आईला मुद्दामहून स्टेजवर बसायला सांगितले. हे सांगताना काही क्षण थांबलेले आदित्य भावूक झालेले दिसले. स्टेजवर बसलेल्या रश्मी ठाकरे या देखील भावूक झालेल्या पहायला मिळाल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई विमानतळ उद्यापासून 100 टक्के प्लास्टिकमुक्त

Next Post

शिवस्मारकाच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार; शिवस्मारक उभारण्याचा उद्देश हा पैसे खाण्यासाठी असल्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुन्हा आरोप

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
शिवस्मारकाच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार; शिवस्मारक उभारण्याचा उद्देश हा पैसे खाण्यासाठी असल्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुन्हा आरोप

शिवस्मारकाच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार; शिवस्मारक उभारण्याचा उद्देश हा पैसे खाण्यासाठी असल्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुन्हा आरोप

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us