Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड

najarkaid by najarkaid
October 30, 2019
in राज्य
0
भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

महायुतीचे भक्कम सरकार लवकरच स्थापन करणार – मा. मुख्यमंत्री

मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी बुधवारी मुंबईत एकमताने भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. राज्यातील मतदारांनी भाजपा शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून महायुतीचे सरकार लवकरच स्थापन करण्यात येईल आणि गेल्या पाच वर्षांत राज्याच्या विकासासाठी जे काम केले त्यापेक्षा अधिक काम आगामी पाच वर्षांत करू, असे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नेता निवडीसाठी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपा माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे, भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. अतुल भातखळकर, आ. रामदास आंबटकर आणि मा. सुरेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीने मते मागितली आणि जनतेने महायुतीला आशिर्वाद दिला. महायुतीला स्पष्ट जनादेश असून लवकरच महायुतीचे भक्कम सरकार स्थापन होईल.

भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी उपस्थित आमदारांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही त्यांनी साथ दिल्याबद्दल आभार मानले.

त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत समाजाच्या सर्व घटकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केला. आपले प्रश्न हेच सरकार सोडवू शकते, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला. गेल्या पाच वर्षांत केले त्यापेक्षा अधिक काम आगामी पाच वर्षात करायचे आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतीला पाणी, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विकास हे आपले प्राधान्याचे विषय असतील.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मा. हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि आशिष शेलार या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी अनुमोदन दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय एकात्मतेसाठी  रन फॉर युनिटी’ चे आयोजन-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

Next Post

सगळं ठरल्याप्रमाणे झालं तरच महायुतीचं सरकार!

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सगळं ठरल्याप्रमाणे झालं तरच महायुतीचं सरकार!

सगळं ठरल्याप्रमाणे झालं तरच महायुतीचं सरकार!

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us