Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय एकात्मतेसाठी  रन फॉर युनिटी’ चे आयोजन-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

najarkaid by najarkaid
October 30, 2019
in जळगाव
0
राष्ट्रीय एकात्मतेसाठी  रन फॉर युनिटी’ चे आयोजन-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.  या दिनानिमित्त समाजात एकात्मता वाढीस लागावी. या उद्देशाने जळगाव जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, गृहरक्षक दल, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव रनर्स ग्रुप व महानगर पालिकेच्यावतीने दि. 31 ऑक्टोबर रोजी ‘रन फॉर युनिटी’ चे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय एकात्मता दौडमध्ये जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, व्यापारी असोसिएशन, क्रीडा संघटना, खेळाडू तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एकता दौड (Run For Unity ) च्या पूर्वतयारी बैठकीत केले.

या बैठकीस  जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,  प्र. निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर, जळगाव रनर्स ग्रुपचे डॉ. विवेक पाटील, डॉ.उमेश पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील डॉ. प्रा. मोहिनी उपासनी, तहसिलदार वैशाली हिंगे, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक  सर्वश्री गोरक्ष शिरसाठ, युनुसखान पठाण, बापू रोहम तसेच मनपा, गृहरक्षक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

राष्ट्रीय एकात्मतेसाठी आयोजित या  दौडच्या अगोदर सकाळी 6 ते 6.30 वाजेदरम्यान खान्देश मॉल येथे जळगाव रनर्स ग्रुपतर्फे दौडमध्ये सर्व सहभागींसाठी योगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 6.30 वाजता पोलीस बँडसह दौडमध्ये सर्व सहभागी सामील होतील  आणि तद्नंतर खान्देश मॉल येथून एकता दौड सुरू होईल. शहरातील नेहरू चौक – टॉवर चौक – चित्रा चौक – नेरीनाका – मार्गे स्वातंत्र्य चौक आणि तेथून बसस्टँड समोरून जावून खान्देश मॉल येथे दौडची सांगता होईल.

एकता दौड दरम्यान राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे रन फॉर युनिटी मध्ये सर्व सहभागींसाठी टी शर्ट   पुरविण्यात येणार असून टी शर्ट परिधान करून रनर्स या दौडमध्ये धावणार आहे.

या दौडमध्ये शासकीय  अधिकारी, खेळाडू, विविध क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी, जळगाव रनर्स ग्रुपचे पदाधिकारी, प्रतिनिधी सोबतच विविध स्वयंसेवी संघटना, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर, युवक, युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मल्हारच्या ‘जळगाव फेमस ५०’ डिरेक्टरीचे सौ. ज्योती अशोक जैन यांच्या हस्ते विमोचन

Next Post

भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us