Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राष्ट्र निर्माणाचा पाया – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

najarkaid by najarkaid
January 4, 2021
in राज्य
0
नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राष्ट्र निर्माणाचा पाया – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 4 : नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.सामंत यांच्या हस्ते झाले.

संसदेच्या केंद्रीय सभागृहात दि. १२ जानेवारी, २०२१ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेच्या पार्श्वभूमीवर राज्यपातळीवरील स्पर्धा नेहरू युवा केंद्र, पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना, क्षेत्रीय कार्यालय पुणे यांच्यावतीने गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी श्री. सामंत हे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

श्री.सामंत म्हणाले, माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासाच्या सुरूवातीला नेहरू युवा केंद्र युवा मंडळाच्या माध्यमातून कामे केलेली आहेत. केंद्राच्या अनेक उपक्रमात मी सहभागी होतो. या माध्यमातून केलेल्या कामांच्या आठवणींना आज उजाळा देत असताना मनस्वी आनंद होत आहे.  कोरोना काळात नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असे योगदान दिलेले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतून विजयी झालेले स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरही आपल्या राज्याचे नाव उज्ज्वल करतील असा मला विश्वास आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे तिथे प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की मिळते. सकारात्मक रहात सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर सर्वकाही शक्य आहे, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आयाती पिनाक मिश्रा, प्रतीक रमेशराव ठाकरे आणि सलोनी संजय त्रिवेदी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.

दि.१२ जानेवारी २०२१ रोजी संसदेच्या केंद्रीय सभागृहात राष्ट्रीय युवा संसद पार पडणार आहे. या स्पर्धेत सर्व राज्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धकांना सहभागाची संधी मिळणार आहे. तसेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विजयी होणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे दोन लाख, दीड लाख आणि एक लाख असे बक्षीस देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रल्हाद सोनुने, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन, पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी विनीत मालपुरे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक वैभव अनिल अलई यांनी राज्यस्तरीय युवा संसद यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागपूर विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष !

Next Post

आश्रमशाळा आणि वसतिगृहे यांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

आश्रमशाळा आणि वसतिगृहे यांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us