Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा ३० रोजी जळगावला प्रयोग

najarkaid by najarkaid
November 29, 2022
in Uncategorized
0
नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा ३० रोजी जळगावला प्रयोग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.29 प्रतिनिधी –  ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे उद्या ता. ३० नोव्हेंबर ला संध्याकाळी ७ वा. कांताई सभागृह (नवीन बसस्थानकाजवळ) येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सहकार्याने हे सादरीकरण होईल.

स्थानिक कलाप्रेमींच्या सहकार्याने आयोजित या प्रयोगाला प्रवेश नि:शुल्क आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जवळपास वीस प्रयोग होत आहेत. त्यात पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, लातूर, अंबाजोगाई, सेलू, परभणी, हैदराबाद, वरोरा, नागपूर, वर्धा येथील प्रयोगानंतर जळगाव येथे पहिला प्रयोग होत आहे. दोन अंक आणि मध्यंतराचा कालावधी वगळता दोन तास असा या प्रयोगाचा अवधी आहे. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे आहे.

नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपयुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले आहे. अनेक मान्यवरांनी कौतुक केलेल्या, सकस आणि रंजक विचार-यात्रा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

अनोखे रंगमंचीय सादरीकरण सुप्रसिद्ध विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे ‘नरहर कुरुंदकर–एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे. हा कार्यक्रम म्हणजे नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाचा एक प्रकारचा अभिनव नाट्यप्रयोग आहे. मुंबई आणि नांदेड येथील प्रथितयश कलाकर हा प्रयोग सादर करतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, विश्वास अंबेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि सुप्रसिद्ध दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.

नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात.

Spread the love
Tags: #नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला प्रयोग
ADVERTISEMENT
Previous Post

NCL Recruitment : नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये बंपर भरती, 10वी पास अर्ज करू शकतात

Next Post

कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO

कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us