Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया 2010 किमी सायकल ने प्रवास करून केला विक्रम

najarkaid by najarkaid
December 7, 2020
in राज्य
0
दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया 2010 किमी सायकल ने प्रवास करून केला विक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया 2010 किमी सायकल ने प्रवास करून विक्रम स्थापीत केला आहे. त्यांच्या विक्रमाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. यशोमती ताई ठाकूर, जिल्हाधीकारी शैलेश नवाल साहेब,आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंत वानखडे, राजकुमार पटेल ,जितू ठाकूर,सोसायटी अध्यक्ष यावली शहीद येथील पंकज देशमुख,सागर देशमुख, हरीषजी मोरे , आर्मी एक्स मँन व आयन बॉल चे विदर्भ प्रभारी वैभव पवार, पत्रकार राजेंद्र ठाकरे,साप्ता. साधनाराज वृत्तपत्राच्या संपादिका कंचनताई मुरके, समाजसेवक विशाल पवार यांच्या उपस्थितित जंगी स्वागत  करण्यात आले.

अजय लालवाणी एक पंचविशीतला युवक जन्मापासून अंध असून विविध क्रीडा प्रकारात आपले प्राविण्य ते दाखवीत आहेत. बृहन्मुंबई येथील महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात नोकरीला असलेल्या अजय लालवानी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या दृष्टीहीन व मूकबधीरांच्या जागतिक ज्युडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जून २०१९ मध्ये  हिमालयातील ‘फ्रेन्डशिप पीक’ व ऑगस्ट २०१९ मध्ये ‘माऊंट युनुम’ ही शिखरे पादाक्रांत केली. डिसेंबर २०१९ मध्ये मुंबई-गोवा हे १२०० किमी अंतर सायकलने सात दिवसात पार केले.  सलग दोन वर्षे जलतरण स्पर्धेत राज्य व विभागीय पातळीवर ‘फ्री स्टाईल’, ‘ब्रेस्ट स्ट्रोक’ व ‘बटरफ्लाय’ प्रकारात पदके जिंकली. दिव्यांगांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, व तीन खुल्या मॅरेथॉन शर्यतीत त्यांनी भाग घेतला आहे.    दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात मागील चार वर्षापासून मल्लखांबाचा सराव करीत आहे. आता मुंबई ते गोंदिया व परत हे २०१० किमी अंतर सायकलवरून १२ दिवसात पार करण्यासाठी सिद्ध झाला आहे.

गुरुवार, दि. ३ डिसेंबर २०२० रोजी पहाटे चार वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील श्री समर्थ व्यायाम मंदिरासमोरून त्याची ही ऐतिहासिक सायकल दौड सुरु झाली होती. त्याला प्रा संदेश चव्हान रत्नागीरी आयन बॉल अंबासिटर  गोपीनाथ आरज (४१), भगवान पाटील (३५)दापोली ल,राजे स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रक्षिक्षक प्रा.संदेश चव्हाण(३२),प्रा.प्रशांत देशमुख (३५), प्रथमेश अडवडे (२०),निरंकार पगडे(१३), मंदार पाटील (१८), गणेश सोनावणे (२२), रितिक कासले (१८),  अण्णासाहेब घुमरे (४९) ही मंडळी साथ देत आहेत. दररोज सुमारे १७० किमी अंतर पार करून वाटेत नाशिक, धुळे, दाताले, अमरावती, व नागपूर या पाच ठिकाणी तो रात्रीची विश्रांती घेईल. दि. ८ डिसेंबर २०२० रोजी गोंदिया येथे पोचून दि. ९ डिसेंबर २०२० रोजी तो परत निघेल व याच मार्गाने दि. १४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी मुंबईस परत येईल. हे शिवधनुष्य उचलण्यामागचा त्याचा उद्देश स्पष्ट आहे. ‘माझ्या दिव्यांग मित्रांनीही पुढे येऊन असे उपक्रम करून बघावेत, त्यात सहभागी व्हावे , तुमची चिकाटी व तुमचे धैर्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही, उलट तुम्हाला दुप्पट सामर्थ्य देते हे, आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे.’ ‘गेले आठ महिने सतत जाणवणारी अव्यक्त भीती, अनिश्चितता व चिंता यावर मात करण्यासाठी शासनाचे सर्व निर्बंध पाळून अत्यंत जबाबदारीने आखलेली ही साहसी मोहीम करोनाच्या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी केवळ माझ्या दिव्यांग बांधवांनाच नव्हे तर इतरही सर्वांनाच एक नवी उमेद, उत्साह व उभारी देईल’ असा विश्वास त्यांनी सत्कारानंतर बोलतांना दिला. अजयचे पुढचे स्वप्न ऑक्टोबर २०२१ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी हे ३७०० किमी अंतर सायकलवरून २५ दिवसात पार  करण्याचे आहे. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’साठीही याची नोंदणी करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगीतले.

या प्रसंगी अमीत पवार, युवा संवाद प्रतिष्ठान चे समस्त पदाधिकारी मंडळींची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, ऑनलाईन अभिवादन करुन लाखो अनुयायांनी सर्वांसमोर एक अनोखे उदाहरण ठेवले

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, ऑनलाईन अभिवादन करुन लाखो अनुयायांनी सर्वांसमोर एक अनोखे उदाहरण ठेवले

चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, ऑनलाईन अभिवादन करुन लाखो अनुयायांनी सर्वांसमोर एक अनोखे उदाहरण ठेवले

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us