Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का ; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय

Editorial Team by Editorial Team
March 2, 2023
in राजकारण, राज्य
0
कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का ; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला असून कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे.

पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१ व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचा अपवाद वगळता प्रत्येक फेरीत धंगेकर रासनेंना वरचढ ठरले. रवींद्र धंगेकर यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान केलं. सरतेशेवटी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना ११ हजार मतांनी पराभवाची धूळ चारत विधानसभेत पाऊल ठेवलं आहे.

हे पण वाचा. 

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! बँक उघडण्याची-बंद होण्याची वेळ बदलणार?

जळगाव: यूट्यूब पाहून बनावट नोटा छापणे शिकला, पण.. हमालाची कमाल पाहून पोलिसही चक्रावले

भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक ; VIDEO समोर

मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमक काय आहे प्रकरण?

कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. धंगेकरांनी भाजपच्या रासनेंसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं.  पुण्यातील १०० पेक्षा जास्त माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौज आधीच हेमंत रासने यांच्यासाठी कामाला लागली होती. पण धंगेकारांचा झंझावात पाहता यांचा टिकाव लागत नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच ते सहा मंत्री कसब्यात तळ ठोकून होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील शेवटचे सहा दिवस कसब्यातच होते. इतकंच काय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसब्यात घर घेऊन ते प्रत्येक अपडेटवर जातीने लक्ष ठेऊन होते

तरी पण रासनेंना धूळ चारत रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. पश्चिम भागातील मतदारांना आकर्षित करण्यात हेमंत रासने अपयशी ठरले. शिवाय पूर्व भागावर संपूर्ण फोकस करुनही जनतेने रासने यांना साथ दिली नाही. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! बँक उघडण्याची-बंद होण्याची वेळ बदलणार?

Next Post

बँकेत नोकरीची मोठी संधी.. या सरकारी बँकेत निघाली बंपर भरती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज

बँकेत नोकरीची मोठी संधी.. या सरकारी बँकेत निघाली बंपर भरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us