जळगाव : यूट्यूबवर ज्ञानाच भांडार आहे. या प्लॅटफॉर्मवरून अनेकजण खूप चांगलं शिकतात. पण काही लोक यूट्यूवरून चुकीच्या गोष्टीही शिकतात. यावर तुम्हाला पैसा कमावण्याच्या अनेक पद्धतीही सापडतात. यातच युट्युबवर व्हिडिओ पाहून हमाल बनावट नोटा छापणे शिकला. पण पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केलीय. हमालाची ही कमाल पाहून पोलिसही चक्रावले आहे.
जळगाव शहराला लागून असलेल्या कुसूंबा येथील देविदास पुंडलिक आढाव याला नोटा चालविण्यासाठी ५० हजारात दीड लाखाच्या नोटा देणाऱ्यास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्याच्याकडून १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नकली नोटा चलनात आल्या असून पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी बनावट नोटा पकडल्या होत्या. दरम्यान बुधवारी चोपडा उपविभागीय कार्यालयातील पोलिस नाईक राहुल बैसाने यांना एक व्यक्ती बनावट नोटा छपाई करून विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती. बैसाने यांनी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना कळविले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले.
हे पण वाचा.
भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक ; VIDEO समोर
मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमक काय आहे प्रकरण?
एलपीजी सिलिंडर, कर्ज घेणे महागले ; आजपासून देशात झाले हे मोठे बदल
पथकाने सापळा रचून नोटा छपाई करणारा कुसूंबा येथील देविदास पुंडलिक आढाव (वय ३१) याला बोलाविले. ५० हजारात दीड लाखांच्या बनावट नोटा देण्याचा हिशोब ठरला होता. पोलिसांनी त्याला तीन लाखांच्या नोटांची मागणी केली. आढाव याला संशय आल्याने अगोदर त्याने पोलिसांना चकवा दिला. सुमारे तीन तास पोलिसांना चकवा दिल्यावर त्याने गावाबाहेर एका टेकडीवर बोलाविले. आढाव दुचाकी घेऊन त्याठिकाणी उभा होता. पथकातील दोन कर्मचारी अगोदर पुढे गेले आणि त्यांनी त्याच्याकडून नोटा पाहून त्याला ताब्यात घेतले. तसेच लपलेले इतर कर्मचारी देखील तिथे पोहचले. पथकाने आढाव यांच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा व त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले.

