पालघर : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शार्दुल ठाकूरच्या लग्नाच्या स्वागत समारंभात भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा प्रकार समोर आला. या दोन गटाच्या शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ समोर आला आहे.
क्रिकेट शार्दुल ठाकूरच्या मंडपातून बाहेर पडत असताना घटना घडली. भाजपच्या (BJP) दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. डहाणूनगर परिषदचे नगराध्यक्ष भरत राजपूत गट आणि मंत्री रवींद चव्हाण यांच्या गटात जोरदार शाबदिक चकमक झाली आहे.भाजपमधील दोन गटातील मतभेद समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे पक्षातील कार्यकर्त्यांमधील मतभेदाचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पालघर
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शार्दुल ठाकूरच्या लग्नाच्या स्वागत समारंभात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक pic.twitter.com/I9ANeL36Oa— vishal vijay (@vishalvijay5454) March 2, 2023
दरम्यान, शार्दुल ठाकूरने नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. २७ फेब्रुवारी रोजी तो मिताली पारूलकरसोबत विवाह बंधनात अडकला. २०२१ मध्ये दोघांचाही साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. आता तब्बल १५ महिन्यांनंतर दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे.
शार्दुलच्या मित्र मंडळींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी लग्नसमारंभासाठी हजेरी लावली. तसेच भाजपसहित इतर राजकीय पक्षातील नेत्यांनी देखील शार्दुलच्या लग्नाला हजेरी लावली. सोशल मीडियावर देखील शार्दुल ठाकूरच्या विवाहाचे फोटो व्हायरल झाले आहे.

