Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद

najarkaid by najarkaid
May 23, 2021
in जळगाव
0
ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

•लॉकडाऊन काळातील मोबाईल रिटेलर्सच्या विविध समस्या, ई-कॉमर्स कंपन्यांच्या नियमबाह्य विक्रीकडे मोबाईल असोसीएशनने वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

•मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोबाईल रिटेलर्सच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : करोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात तब्बल दीड महिन्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य सर्व व्यापार बंद आहे. सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाईल रिटेलर्सनेही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले आहेत. परंतु या काळात विदेशी ई-कॉमर्स कंपन्या ( फ़्लिपकार्ट आणि अमझोन ) शासनाच्या नियमांना बगल देत सर्रास इतर वस्तू विक्री करत आहेत. या नियमबाह्य प्रकारांना आळा बसण्यासाठी कडक पावलं उचलावीत अशी मागणी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

लॉकडाऊन काळातील विविध समस्या मांडण्यासाठी असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी असोसिएशनचे संस्थापक चेअरमन कैलाश लखयानी, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष विभूति प्रसाद, राष्ट्रीय सरचिटणीस भावेश सोळंकी, सहसचिव नवनीत पाठक, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, राज्य सरचिटणीस जुझेर ढोरजीवाला आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले होते.

अजित जगताप यांनी सुरूवातीलाच करोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर करीत असलेल्या प्रभावी उपाययोजना व रूग्णसंख्येत झालेली घट याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र लवकरच करोनावर मात करेल असा विश्वास व्यक्त केला. जगताप यांनी महाराष्ट्रातील मोबाईल रिटेलर्सनी ब्रेक द चेन निर्बंधांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत अतिशय जबाबदारी पूर्वक नियमावलीचे पालन केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

विभूति प्रसाद यांनी मोबाईल रिटेलर्सच्या समस्या मांडताना सांगितले की, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करताना सरकारने ई कॉमर्स कंपन्याना फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अनेक विदेशी कंपन्या मोबाईल तसेच इतर वस्तुंची सर्रास विक्री करत आहेत. रिटेलर्स प्रामाणिकपणे नियम पाळत असताना या कंपन्या नियम पायदळी तुडवून विक्री करतात. यामुळे रिटेलर्सचे मोठं नुकसान होत असून सरकारने याबाबतीत कठोर पावलं उचलली पाहिजेत अशी आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला माहिती घेऊन नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

सध्या मोबाईल दुकाने बंद असल्याने या काळात वीज बिलांच्या स्थिर आकारात सवलत मिळावी, लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर ग्राहकांना निर्धोकपणे दुकानात येऊन खरेदी करता यावी यासाठी व्यावसायिक व त्यांच्या कडील कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असोसिएशनच्या विविध समस्या सरकारकडे मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावा अशा मागण्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कडे करण्यात आल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यात सर्वच घटकांचे जलद लसीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच व्यापारी वर्गाला दिलासा देणारे निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. असोसिएशनच्या मागणी नुसार नोडल अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही तात्काळ केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी करोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर, सॅनिटाजरचा वापर याविषयी प्रत्येक रिटेलर्सने स्वतः तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन केलं. येत्या काळात जास्तीत जास्त मोबाईल रिटेलर्स बरोबर झूम मिटींगद्वारे संवाद साधायला आवडेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या चर्चेतून अनेक महत्त्वपूर्ण विषयांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने पावले उचलल्याने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

भावेश सोळंकी यांनी या मिटींगसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून वेळ देत असोसिएशनच्या समस्यांची आस्थेवाईकपणे नोंद घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अष्टपैलू कलावंत कीशोर श्रीधर बाविस्कर यांना भारत भूषण पुरस्कार व ग्लोबल टिचिंग एक्सलन्स पुरस्कार जाहीर

Next Post

यावल येथे आमदार शिरीष चौधरीच्या वाढ दिवसानिमित्ताने ५५रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान ; युवकांचा मोठा सहभाग

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
यावल येथे आमदार शिरीष चौधरीच्या वाढ दिवसानिमित्ताने ५५रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान ; युवकांचा मोठा सहभाग

यावल येथे आमदार शिरीष चौधरीच्या वाढ दिवसानिमित्ताने ५५रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान ; युवकांचा मोठा सहभाग

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us