Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक ; आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

najarkaid live by najarkaid live
October 21, 2024
in Uncategorized
0
मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक ; आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीचे  जागावाटप जवळपास निश्चित झाले असून महायुतील भाजपाने कालच पहिली यादी जाहीर करून ९९ उमेदवारांची यादीवर शिक्कामोर्तब केला. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, रावेर,चाळीसगाव आणि भुसावळ विधानसभेचे उमेदवार भाजपाने जाहीर केल्याने महायुतीतील जळगाव जिल्ह्यातील जागावाटपाचा प्रश्न सहज सुटला असं म्हणता येईल मात्र भाजपने मुक्ताईनगर विधानसभेचा उमेदवार जाहीर न केल्याने मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘शिवसेनेला‘ सोडला असावा अशी राजकीय वर्तुळात चर्चा होतांना दिसत आहे.

विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना आज शिवसेनेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता 

विधानसभा निवडणुकीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीने बहुतांशी मतदारसंघात स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील जागावाटपाचा प्रश्न सहज सुटला आहे.मुक्ताईनगर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला साथ दिली असून ते पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत.शिंदे सरकार स्थापन झाल्यावर सुद्धा आ. चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहिल्याने मतदार संघात मोठा निधी आणण्यात मोठं यश आलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला होता.या मतदारसंघातून रोहिणी खडसे या भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात बंडखोरी करून चंद्रकांत पाटील अपक्ष आमदार झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ नैसर्गिक न्यायाने शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आला असावा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्ताईनगर मतदार संघाच्या दौऱ्यावर 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून मुक्ताईनगर येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत .आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगरमध्ये तीन ते चारदा येऊन गेले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वीदेखील मुख्यमंत्री हे मुक्ताईनगरमध्ये येणार होते मात्र तो कार्यक्रम रद्द झाला. आचारसंहिता लागल्यावर मुख्यमंत्री आज मुक्ताईनगरात येणार आहेत. मात्र आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री हे कोणतीही घोषणा करू शकणार नाही मात्र, शिवसेनेने अद्याप (शिंदे गट) उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसून ही यादी आज मुक्ताईनगरमधून जाहीर करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.दरम्यान याचं वेळी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आहे.

मुक्ताईनगर विधानसभेत चूरशीची लढाई 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचा उमेदवार म्हणून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यास मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे विरुद्ध शिवसेनेचे चंद्रकांत पाटील अशीच लढत राहिल असे दिसते. यात चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने सत्तेचे पाठबळ आहे, सरकारची कामे आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे आहेत. तर रोहिणी खडसे यांच्या मागे एकनाथ खडसे यांचे नेटवर्क, शरद पवार यांना मानणारा वर्ग, त्यांच्यासाठीची सहानुभूती आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंचनाम्याचे नाटक बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा: वैशालीताई सुर्यवंशी

Next Post

तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर ; यावल -रावेर विधानसभा मतदार संघातून अनिल चौधरी रिंगणात

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us