जळगाव,(प्रतिनिधी)- भारत मातेचा महान सुपुत्र ,अपराजित योद्धा,वीर शिरोमणी अजरामर महाराणा प्रताप सिंह यांच्या ४८४ व्या जयंती निमित्त आज दि.९ मे रोजी श्री. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमा समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य कार्यध्यक्ष प्रवीणसिहं पाटील यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जळगाव शहरातील महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे आज ९ मे रोजी सकाळी ९ते १० प्रतिमा पूजन व स्मारकास माल्यार्पण संध्याकाळी ५ते ७ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.यावेळी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांचे सहकार्य लाभत आहे.
तरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री ना. गिरीश महाजन आ. राजुमामा भोळे , स्मिता ताई वाघ,श्री उदयसिंह पाटील पाचोरा आ. किशोर आप्पा पाटील ,रावेर खासदार श्रीमती रक्षा खडसे ,शिवसेना जिल्हा प्रमुख दीपक सिंह राजपुत ,प्रताप गुलाबराव पाटील , पवन सोनवणे व समाज बांधव
प्रवीणसिंह पाटील प्रदेश कार्याध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना टीम खान्देश महाराष्ट्र उपस्थित राहणार आहेत.










