Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुष्पवृष्टी,रेकॉर्ड ब्रेक गर्दी ; आ. किशोरअप्पा पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज

भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

najarkaid live by najarkaid live
October 24, 2024
in Uncategorized
0
पुष्पवृष्टी,रेकॉर्ड ब्रेक गर्दी ; आ. किशोरअप्पा पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा) : महायुतीचे उमेदवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी आज दिनांक २४ ऑक्टोबर गुरुवार रोजी आपला उमेदवारी अर्ज भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल केला दरम्यान यावेळी निघालेल्या रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि शिवमय घोषणांनी पाचोरा दणानले. आमदार किशोर पाटील यांचा अर्ज दाखल करण्याचासाठी मोंढाळा रस्त्यावरील तुळजाई जिनिंग वरून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. सुमार दोन किलोमीटर पेक्षा अधिक अंतराची रॅली होती. किशोर पाटील यांनी बैलगाडीवरून प्रवास करत अर्ज दाखल केला. यावेळी बैलगाडीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण बैलगाडीवर होते. रॅलीत तरूंणासह महीलांची गर्दि लक्षणीय होती.

विजयाचा विश्वास – आ. किशोरअप्पा पाटील 

मी दहा वर्षात मतदारसंघाचा केलेला विकासावर तुम्ही दाखवलेला विश्वासामुळे आज नामांकन अर्ज भरण्यासाठी आपण केलेली रेकार्डब्रेक गर्दि ही आगामी विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली असून आता पुढच्या टप्प्यात जलसंधारण व रोजगार निर्मितीच्या विषयावर काम करणे माझा मुख्य अंजेडा रहाणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.

पाचोरा-भडगाव मतदारसंघाचा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, मला मोठ्या विश्वासाने माय बाप जनतेने सलग दोन टर्म निवडुन दिले. तुमचा माझ्यावरचा विश्वास मी सार्थ ठरवित तब्बल 3 हजार कोटीची विकास कामे मतदारसंघात केली. म्हणूनच आज तुम्ही माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एवढ्या रेकार्डब्रेक संख्येने उपस्थीत आहात. आता मला तुमच्यामुळे विजयाची पुर्णपणे खात्री आहे. आता पुढच्या टप्प्यात मतदार संघातील तरूणांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलध्द व्हावा यासाठी मंजुर असलेल्या एमआयडीसीत मोठे उद्योग आणून रोजगार उपलध्द करून देण्याचे माझे लक्ष असणार आहे. तसेच सूतगिरणीच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती चा आपला प्रयत्न आहे तर गिरणा नदिवर प्रलंबित असलेले बंधाऱ्यांना शासनाकडून निधी आणून ते पुर्ण करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गिरणा पट्टा समृध्द करण्याचा माझा मानस आहे. तर नार-पार-गिरणा नदिजोड प्रकल्पाला चालना देण्याचा विषय माझ्या मुख्य अंजेडावर आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्याच्या काकांने बाजार समितीत शेतकऱ्यांना मारहाण केली, शेतकऱ्यांच्या हक्काची बाजार समितीची जागा हडपण्याचा प्रयत्न केला ते मला शेतकऱ्यांसाठी काय केले ते विचारता? ज्याचे आयुष्य कमिशनवर गेले ते मला कमिशनवर काय बोलतील. यांना त्यावर बोलण्याची नैतिकता तरी शिल्लक आहे का? अशी टीका करत दिलीप वाघ व अमोल शिंदेचा चांगलाच समाचार घेतला. आमदार मंगेश चव्हाण म्हटले की, किशोर आप्पाची ही अर्ज दाखल करण्याची सभा नसून विजयी सभा आहे. महायुतीचे सर्व मित्र पक्ष हे ताकदीने किशोर आप्पांच्या मागे राहतील. किशोर आप्पांनी मतदारसंघाचा केलेला विकासामुळे त्यांचा विजय होणे हे त्याच्यांपेक्षा तुमची गरज आहे. ते विजयी झाले तरच विकासाला अधिक गती मिळेल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी ही आमदार किशोर आप्पांची हॅट्रीक पक्की असल्याचे मत मांडले तर शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले यांनी ही प्रखरतेने तोफ डागली. याशिवाय भाजपचे मधुकर काटे यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते महायुती म्हणुन किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीमागे असल्याचे सांगीतले. पीआरपीचे राजू मोरे, चंद्रकांत धनवडे माजी नरगसेवक रविंद्र पाटील यांनी ही भाषणे केली. यावेळी व्यासपीठावर चाळीसगावाचे आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास पाटील, आरपीआय चे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, शिवसेनेचे प्रवक्ते प्रदिप देसले, पीआरपी चे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, बाजार समीतीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती पी.ए.पाटील, भडगाव शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, पाचोरा माजी नगराध्यक्ष संजय गोहील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, किशोर बारावरक, तालुकाप्रमुख सुनील पाटील, संजय पाटील, युवासेनेचे लखीचंद पाटील, जितेंद्र जैन, आरपीआय चे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, विनोद अहीरे, शशिकांत येवले, अजय चौधरी, बबलू देवरे, सुमित सावंत, भोला पाटील, माजी नगरसेवक अय्युब बागवान, रफिक बागवान,शाकीर बागवान, डॉ. शांतीलाल तेली, भिल्ल समाज संघटनेचे धर्माभाऊ बाविस्कर, एकनाथ महाजन, आनंद सोपे, विनोद बागुल, मतिन बागवान,डाॅ.भरत पाटील, पंढरीनाथ पाटील, समाधान पाटील, संतोष महाजन, अतुल परदेशी, रविंद्र पाटील, राहुल पाटील, डाॅ. अर्चना पाटील, डाॅ.प्रियंका पाटील, इंदल परदेशी, हिंमत निकम, बंडू चौधरी, देवा अहीरे,सुरेंद्र मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण ब्राम्हणे यांनी केले.

किशोआप्पांसह महायुती 11 उमेदवार निवडून येतील- मंत्री गिरीश महाजन

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांसह महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना माल्यार्पण केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी याठिकाणी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी म्हटले की, मला अगोदर सहा निवडणुकांचा अनुभव आहे. त्यामुळे मी याठिकाणी पाहत असलेले चित्र किशोर आप्पा पाटील यांच्या हॅट्रीक ची नांदी आहे. ते तर निवडुन येतीलच पण जिल्ह्यातील महायुतीचे सर्व 11 आमदार निवडून येतील याची शंभर टक्के खात्री असल्याचे सांगतीले. महायुती म्हणुन पुर्ण ताकदीनिशी माझ्यासह भाजप पक्ष किशोर पाटील यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव खासदार स्मिता वाघ यांनीही किशोर पाटील यांच्या विजयाची खात्री दिली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल

Next Post

विधानसभा निवडणुक ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us