Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल

मतदार विरोधकांच्या छाताडावर भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही - गुलाबराव पाटील

najarkaid by najarkaid
October 24, 2024
in Uncategorized
0
सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल

मतदार विरोधकांच्या छाताडावर भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही – गुलाबराव पाटील

कार्यकर्त्यांचा जोश आणि उत्साह शिगेला : महायुतीच्या भव्य रॅलीने दणाणली धरणगाव नगरी

धरणगाव /जळगाव दि. 24 : – महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सुमारे २० हजाराच्यावर कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेनेची मुलुख मैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन ना. पाटील यांची भव्य रॅली सुरू झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून हजारोंच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या रॅलीत गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. सभेत गुलाबराव पाटील यांनी शेरो-शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीका केली. “जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हे माझ्यासाठी टॉनिक आहे,” असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले आणि विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आगामी निवडणुकीत कोणताही निष्काळजीपणा न करता १ महिना मेहनत घ्यावी. तुमच्यासह व लाडक्या बहिणीच्या मेहनतीने व साथीने विरोधकांच्या छाताडावर भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही याची १०० % खात्री आहे. येत्या २७ तारखेला श्री क्षेत्र पद्मालय येथे प्रचार नारळ फोडणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अर्ज दाखल करून आल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, गुलाबभाऊ हे पाचव्यांदा निवडणूक लढवत असून देखील पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी अर्ज भरतांना दिसून आल्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा आशावाद ना. गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.*

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आज धरणगावात अक्षरश: जनसागर उसळल्याने शहरात भव्य यातेचे स्वरूप होते. मतदारसंघातील विविध गावांमधून हजारोंच्या संख्येने समर्थकांनी वाजत-गाजत – नाचत धरणगाव गाठले.अनेक गावांमधील हजारो तरुणानी घोषणांनी जोरदार जयघोष करत दुचाकी रॅलीच्या माध्यमातून धरणगाव गाठून रॅली व सभेला हजेरी लावली.

सर्वात पहिल्यांदा ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगावचे दैवत मानल्या जाणाऱ्या श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या विजयासाठी साकडे घातले. यानंतर एका उघड्या जीपवरून पालकमंत्र्यांची भव्य रॅली काढण्यात आली. बालाजी मंदिरापासून धरणी, धरणी बाजार, कोट बाजार, पी. आर. हायस्कूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही रॅली आली. संपूर्ण धरणगाव शहर हे भगवामय झाले होते. उघड्या जीपवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चंदू अण्णा सोनवणे, खा.स्मिताताई वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर महाजन, अनिल अडकमोल, शिवसेना, रॉ.कॉ. व भाजपाचे तालुकाध्यक्ष यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी विराजमान होते. यात सहभागी झालेल्या तरूणाईच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आल्याचे दिसून आले. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेसाठी दिनांक २४ रोजी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने आपला अर्ज दाखल केला.

याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन म्हणाले व की, ही सभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नसून विजयी सभा आहे, गुलाबभाऊंनी पाच वर्षे जनतेची सेवा केली असून त्याना प्रचंड मताधिक्यानी निवडून आण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एम. पाटील सर यांनी केले. आभार विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी मानले. याप्रसंगी शिवसेना, भाजपा व अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी -शे कडो गावातून हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यकर्ते, या रॅलीत महिलांची उपस्थिती देखील लक्षनिय होती . रॅलीत उपस्थित नागरिकांसाठी ठिक – ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार राजूमामा भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

Next Post

पुष्पवृष्टी,रेकॉर्ड ब्रेक गर्दी ; आ. किशोरअप्पा पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
पुष्पवृष्टी,रेकॉर्ड ब्रेक गर्दी ; आ. किशोरअप्पा पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज

पुष्पवृष्टी,रेकॉर्ड ब्रेक गर्दी ; आ. किशोरअप्पा पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us