Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नांदगाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाने जपला ऐतिहासिक वारसा!

najarkaid by najarkaid
November 1, 2026
in राज्य
0
नांदगाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण
ADVERTISEMENT

Spread the love

सोयगाव : छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जळगाव या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या सोयगाव तालुक्यातील नांदगाव येथे महाराणा प्रतापसिंहजी यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. लोकसंख्येने लहान असलेल्या या गावातील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत लोकसहभागातून महाराणा प्रतापसिंहजींच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी केली. या उपक्रमातून गावकऱ्यांनी ऐतिहासिक वारसा, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.

या लोकार्पण सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. प्रवीणसिंहजी पाटील, श्री. नवलसिंह पाटील, श्री. इद्रीस मुलतानी, सौ. वृषाली मिरकर, श्री. जे. के. चव्हाण, इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. विश्वजीत सिसोदिया, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री. भगवानसिंह खंडाळकर, जळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंह मोरे आणि श्री. किरण राजपूत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

प्रवीणसिंह पाटील यांनी मांडली सामाजिक उपक्रमांची दिशा

यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. प्रवीणसिंहजी पाटील यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देत समाजाच्या संघटनात्मक आणि सामाजिक विकासावर प्रकाश टाकला. नांदगावसारख्या छोट्या गावातील नागरिकांनी एकत्र येऊन महाराणा प्रतापसिंहजींच्या पुतळ्याची उभारणी केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.

आगामी काळात राजपूत समाजासाठी वधू-वर परिचय मेळावा तसेच युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्याची योजना असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. समाजातील एकोपा वाढवण्यासोबतच शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगतीसाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

प्रा. डॉ. विश्वजीत सिसोदिया यांनी उलगडला महाराणा प्रतापसिंहजींचा इतिहास

इतिहास अभ्यासक तथा श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते डॉ. विश्वजीत सिसोदिया यांनी आपल्या भाषणातून महाराणा प्रतापसिंहजी यांचा दैदिप्यमान, संघर्षमय आणि प्रेरणादायी इतिहास उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. त्यांचे शौर्य, स्वाभिमान, मातृभूमीप्रती निष्ठा आणि संघर्षमय जीवनातून मिळणारी प्रेरणा याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री. नवलसिंह पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केल्या नांदगावशी असलेल्या जुन्या आठवणी

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. रावसाहेब दानवे यांनी आपल्या मनोगतात नांदगावशी पूर्वीपासून असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. गावकऱ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या या ऐतिहासिक स्मारकाचे त्यांनी कौतुक केले.

इद्रीस मुलतानी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

या पुतळा उभारणीच्या कार्यात श्री. इद्रीस मुलतानी यांनी स्वखर्चातून आर्थिक योगदान देत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. त्यांच्या या योगदानाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गावाच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेल्या या सहकार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

ग्रामस्थांच्या एकजुटीतून ऐतिहासिक स्मारकाची उभारणी

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नांदगाव येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर पाटील यांनी केले, तर निवृत्त मुख्याध्यापक श्री. एन. ए. पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकसंख्येने लहान असलेल्या नांदगावातील ग्रामस्थांनी एकजुटीच्या बळावर उभारलेला महाराणा प्रतापसिंहजींचा हा अश्वारूढ पुतळा केवळ एक स्मारक नसून सामाजिक एकता, इतिहासाविषयीची आस्था आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे प्रतीक ठरणार आहे. या लोकार्पण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदगाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदगाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us