Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon ; गोद्री येथील गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ करिता देवेंद्र फडणवीसांनी दिल्या ‘या’ सूचना

najarkaid by najarkaid
November 15, 2022
in Uncategorized
0
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. १५ : जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे 50 ते 60 हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३‘ बाबत सह्याद्री अतिथगृह येथील पूर्वतयारी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन नानोटिया, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, अन्न व प्रशासनचे (आयुक्त) अभिमन्यू काळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, बांधकाम विभागाचे सचिव एस. एस.साळुंखे, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जळगावचे जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो भाविक येतील. त्यामुळे कार्यक्रम स्थळी पायाभूत सुविधा चोख असाव्यात. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे. या कार्यक्रमाच्या नियोजनातील सर्व विभागांतील कामांच्या समन्वयासाठी जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती करावी. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून भाविकांना एक चांगला अनुभव घेता आला पाहिजे, अशा सुविधा सर्व यंत्रणांनी द्याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभाग यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारी पार पाडाव्यात. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास नियोजन समितीमार्फत त्या सोडविण्यात येतील.

श्री.फडणवीस म्हणाले की, गोद्री येथे जाणारे प्रमुख मार्ग, रस्त्यांची कामे सावर्जनिक बांधकाम विभागाने त्वरित हाती घेवून पूर्ण करावीत. गोद्री गावात हेलिपॅड तयार करणे, अतिक्रमण काढणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पिण्याचे पाणी, स्नानगृह, सांडपाणी व्यवस्था करावी. ऊर्जा विभागाने या ठिकाणी नवीन व तात्पुरत्या स्वरुपात ट्रान्सफॉर्मर लावणे, विजेच्या उपक्रेंद्राची क्षमता वाढविणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे या कामाला प्राधान्य द्यावे. परिवहन विभागाने कुंभस्थानी तसेच गोद्री येथे जाण्यासाठी जादा बसेस सोडाव्यात व गर्दी होऊ नये यासाठी वाहतूकीचे नियोजन करावे. ग्रामविकास विभागाने महिला बचतगटांचे स्टॉल्स लाववावेत, वैद्यकीय सुविधा, कायदा व सुव्यवस्था देखील चोख ठेवावी.

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.

Spread the love
Tags: # जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३
ADVERTISEMENT
Previous Post

गावठी पिस्तोल बाळगणारा अंतर जिल्हा टोळीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेलबंद

Next Post

जिल्हा दूध संघातल्या अपहार प्रकरणी व्यवस्थापकासह चौघांना अटक, खडसेंना धक्का

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी-दूध पावडरमध्ये कोट्यावधीचा अपहार; भाजप आमदाराच्या तक्रारीने खळबळ

जिल्हा दूध संघातल्या अपहार प्रकरणी व्यवस्थापकासह चौघांना अटक, खडसेंना धक्का

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us