रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील पुनखेडा येथे स्वस्त धान्य दुकानातून मोफत तांदूळ वितरित करण्यास सुरवात झाली असून या ठिकाणी दुकानावर गर्दी होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानदार यांनी सोशल डिस्टन्स देखील पाळले आहे.
देशात कोरोना प्रादुर्भाव नंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर करून त्या अंतर्गत पिवळे कार्ड व प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना शासनातर्फे प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येत आहे.
पुनखेडा येथे सौ कल्पना समाधान पाटील स्वस्त धान्य दुकान नंबर 138 वरलाभार्थी कार्ड धारक यांना मोफत तांदूळ वाटप करण्यात सुरुवात झाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
वाटपकरीत असताना सरपंच पल्लवी रायमाळे, पोलिस पाटील विजय पाटील, तलाटी झामरे आप्पा, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील लाभार्थी उपस्थित होते.