Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ व्हावी

najarkaid live by najarkaid live
February 28, 2020
in राज्य, राजकारण
0
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ व्हावी
ADVERTISEMENT

Spread the love

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

     मुंबई – आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ व्हावी, तसेच अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयाची मर्यादा देखील वाढवावी आणि सांगली कोल्हापूरमध्ये महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची शासनाच्या वतीने तातडीने पुनर्बांधणीच्या कामास सुरुवात करावी, आदी मागण्या भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर श्री. पाटील बोलत होते.

     मा. पाटील म्हणाले की, गेल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने नानाजी देशमुख यांच्या नावाने एक योजना सुरु करुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर यवतमाळ,उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यांमध्ये गावामध्ये एक समिती तयार करुन, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्या योजना आजही सुरु असल्या, तरी त्यावरील निधीची तरतूद वाढवली पाहिजे. मात्र दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सध्या एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. याद्वारे त्या कुटुंबाला आपला उदरनिर्वाह चालवणे शक्य नाही. त्यामुळे मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात यावी. तसेच,अपघातामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, त्यांच्या कुटुंबियांना आपण चार लाखाची नुकसान भरपाई देतो, त्यामध्येही वाढ करण्यात यावी, आणि यामध्ये विम्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी मा. पाटील यांनी केली.

     त्याचबरोबर यंदा अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना शासनाच्या वतीने हेक्टरी आठ हजार रुपये दिले जात आहेत. मात्र, जी मागणी करण्यात येत होती, त्यानुसार हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ही मागणी मा. पाटील यांनी यावेळी केली.

     तसेच, यंदा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा फटका बसला. यात अनेक घरांची पडझड झाली. ही घरं बांधून देण्याच्यादृष्टीने कोणतीही हालचाल सुरु झालेली नाही. काही खासगी स्वयंसेवी संस्था आणि मान्यवर व्यक्तींनी पुढाकार घेऊन काही प्रमाणात तात्पुरत्या स्वरुपातील घरे उभारुन दिली आहेत. मात्र, यासाठी निधीची उपलब्धता असूनही, अनेक कारणांनी शासनाकडून घरांची पुनर्बांधणी केली जात नाही आहे. त्यामुळे यावर जलदगतीने कार्यवाही व्हावी अशी ही मागणी मा. पाटील यांनी यावेळी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व. वा. वाचनालयात आजपासून पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us