Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in राज्य
0
कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’
ADVERTISEMENT

Spread the love

  • रोजनदारी बुडवून कामगार किट मिळवण्यासाठी वनवन भटकत आहे 
  • किट वाटपासाठी कुठलीही वेळ निश्चित नाही 
  • जिल्ह्यात दोनच ठिकाणी किट वितरण केंद्र
  • जळगाव येथे MIDC परिसरात वितरण केंद्र असल्याने ग्रामीण भागातील कामगारांना पत्ता शोधाशोधसाठी तासनतास होतेय भटकंती 
  • किट वाटपावर गुणात्मक नियंत्रण ठेवण्यात  जिल्हा प्रशासन अपयशी 

जळगाव एमआयडीसी येथील वितरण केंद्र व कामगार

जळगाव (विशेष प्रतिनिधी)- कामगार कल्याणकारी मंडळाच्या व कंत्राटदार कंपनीच्या कुचकामी  नियोजनामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किटसाठी वणवण भटकावं लागत असल्याने त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम किट वाटपाबाबत
कुठल्याही प्रकारची वेळ ठरविली नसल्याने कित्येकांना भर रस्त्यावर मुक्काम ठोकण्याचा प्रसंगही ओढवत आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार कल्याणकारी मंडळामार्फत साहित्य वाटप प्रक्रिया सुरू आहे. परंतु योग्य नियोजन न केल्याने कामगारांना किट वाटपाचे केंद्र शोधण्यात वेळ घालवावा लागतो त्यात तासन्‌तास भल्या पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते. कामगारांच्या सोयीकरिता जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किट वाटपाची प्रक्रिया राबविली जाणे अपेक्षित असतांना शहरापासून दूर एमआयडीसी मध्ये सुरु असल्याने पुरुष कामगारांबरोबरच महिला कामगारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या समस्येकडे जिल्हा प्रशासन आणि कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने किट वाटपाचा गोंधळ सुरू आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम, 2007 मधील तरतुदीनुसार शासनाने 1 मे 2011 ला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे. याअंतर्गत 21 ऑक्‍टोबर 2013 रोजी बांधकाम कामगारांना भेटवस्तू देण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने 24 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना मच्छरदाणी, ब्लॅंकेट, चादर, जेवणाचा डब्बा, चटई या पाच वस्तू खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये दिले जात आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे  जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना गेल्या काही दिवसांपासून बांधकाम किट वाटप कार्यक्रम
सुरू आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या हस्ते किटचे वितरणसुद्धा करण्यात आले. मात्र, किट वाटपाचे नियोजन, कामगारांना
होत असलेला त्रास, याचा विचार केला जात नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त चं.ना.बिरार यांची भेट घेऊन माहिती घेतली असता ते म्हणाले की आजपर्यंत 19608 कामगारांना या किट चे वाटप करण्यात आले आहे. राज्य स्तरावरून हे टेंडर प्रोसेस झाले असल्याने यावर आमचे नियंत्रण नाही असे ते म्हणाले. कामगारांना देण्यात येणारे साहित्य हे योग्य, दर्जेदार आहे की नाही याची गुणात्मक चाचणी अथवा याबाबत नियंत्रण ठेवण्या बाबत आम्हाला वरिष्ठ स्तरावरून कुठल्याच सूचना नाही तसेच कामगारांना कुठले साहित्य देणे गरजेचे आहे या बाबत देखील आमच्या कडे मार्गदर्शक सूचना नसल्याने आम्ही फक्त कामगार नोंदणी करून पडताडनी करतो या पलीकडे आमचा या किट वाटपात काही सहभाग नसल्याचे सांगितले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कामगारांना किट वाटपाचे कंत्राट मुबंईच्या खाजगी कंपनीला देण्यात आले आहे.मात्र टेंडर राज्य स्तरावरून झाल्याने जिल्हा प्रशासना स्तरावरून या किट वाटप चे गुण मूल्यांकन करण्याची यंत्रणाच उपलब्ध नसल्याने या सर्व प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे.

किट वितरणाचे दोनच केंद्र

जळगाव जिल्ह्यात कामगारांना सेफ्टी संच व अत्यावश्यक संच वितरित करण्यासाठी जळगाव (MIDC) व भडगाव येथे दोनच वितरण केंद्र सुरु असल्याने कामगारांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी कामगारांकडून होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शपर शिबीर संपन्न

Next Post

जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता कार्यक्रम उत्साहात

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता कार्यक्रम उत्साहात

जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us