मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. यांची केंद्र सरकारने प्रसारभारतीच्या संचालक मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. मा. शायना एन. सी. यांनी या नियुक्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले. प्रसार भारती ही देशाची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी या सार्वजनिक प्रसारण सेवांचे काम प्रसार भारतीच्या मार्गदर्शनाखाली चालते.













