पाटणा – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. नागरिकत्व कायद्याविरुद्ध शाहीन बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असून प्रक्षोभक भाषणांसाठी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्जीलविरुद्ध विविध पाच राज्यांत गुन्हे दाखल असून गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.














