Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीग पर्व-२ च्या ऑक्शनमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी ठरली तर ओम मुंडे सर्वात महाग आयकॉन खेळाडू ठरला. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
जळगाव दि.२८ प्रतिनिधी – रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग– २०२६, JCL T-20 पर्व-२ मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रॅंचायझी ऑक्शन करण्यात आले. ऑक्शन मध्ये सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या संघासाठी झाली.
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू
ही फ्रँचायझी दाल परिवारने मिळवली. यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या ऑक्शन मध्ये ओम मुंडे सर्वात महागडा आयकॉन खेळाडू म्हणून ठरला. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स या संघाने घेतला. प्रत्येक संघाने आपापल्या प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावून संघाची ताकद वाढवली.
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लीग – २०२६ पर्व-२ चे ‘ऑक्शन’ जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेत जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंटस, जामनेर ब्लास्टर, पाचोरा टायटन्स हे संघ ‘ऑक्शन’ मध्ये निश्चित झाले. ‘ऑक्शन’ मध्ये सहभागी झालेल्या संघ मालकांचा सुतीहाराने सन्मान करण्यात आला. या पर्वात जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळणार असून स्थानिक खेळाडूंना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अतुल जैन, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, मुख्य पंच संदीप गांगुर्डे, हितेश पटेल यांनी आयकॉन खेळाडूंसाठी ड्रॉ काढून त्यांची बोली लावली. अॅड. सूरज जहांगिर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू
संघ व मालकांची माहिती
जळगाव किंग्स – फ्रँचायझी मालक : दाल परिवार, प्रेम कोगटा व अतुल कोगटा
प्रशिक्षक : घनश्याम चौधरी
आयकॉन खेळाडू : जगदीश झोपे
चाळीसगाव चार्जर्स – फ्रँचायझी मालक : सागर पार्क क्रिकेट क्लब