मुंबई/नवी दिल्ली – इस्रायल-इराण युद्धाने खाडी परिसरात तीव्र वळण घेतले असून, इराणने सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. या हल्ल्यांचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर दिसून आला आहे. भारतातील शेअर बाजारही ‘ब्लॅक डे’ अनुभवत आहे, गुंतवणूकदारांची तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती एका दिवसात स्वाहा झाली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि भारतीय इंधन बाजारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com
इतर बातम्या…
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!
Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ
इस्रायल: शहरांवर क्लस्टर क्षेपणास्त्रांचा हल्ला
इस्रायलमधील तेल अवीव आणि जेरुसलेम शहरांवर इराणने क्लस्टर क्षेपणास्त्रांचा मारा केला. इस्रायलची ‘हॅरो’ आणि ‘आयर्न डोम’ संरक्षण यंत्रणा काही क्षेपणास्त्रे पाडू शकली, तरीही अनेक क्षेपणास्त्रे शहरांच्या मध्यभागी कोसळली. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इराक: अमेरिकन दूतावासावर बॅलिस्टिक हल्ले
इरबिल येथे असलेल्या अमेरिकन वाणिज्य दूतावास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. विमानतळाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, इराकमधील सुरक्षा व्यवस्था खडबडली गेली आहे.
सौदी अरेबिया: यानबू तेल शुद्धीकरण प्रकल्पावर आगीचा फटका
यानबू येथील सॅमरेफ तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ल्यामुळे भीषण आग लागली, ज्यामुळे सौदीचा तेल पुरवठा विस्कळीत झाला. रियाधमधील अमेरिकन दूतावासालाही लक्ष्य करण्यात आले, मात्र कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
Job Alert
भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…
Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!
सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही
भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी
UAE: ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला
दुबई आणि अबू धाबी येथील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाला. एक जहाज जळाले आणि जबेल अली बंदरातील इंधन साठ्यांना आग लागल्याने जागतिक व्यापार वाहतुकीवर मोठा फटका बसला. भारतासह अनेक देशांना इंधन पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.
कतार: रास लाफान एलएनजी प्रकल्पावर ड्रोन हल्ले
अल उद्देद येथील अमेरिकेच्या तळावर इराणने ड्रोन हल्ले केले. कतारमधील रास लाफान एलएनजी प्रकल्पावरही क्षेपणास्त्र हल्ला झाला, ज्यामुळे मोठा आर्थिक आणि तांत्रिक फटका बसला आहे.

कुवेत: तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि हवाई तळांवर हल्ले
कुवेतमधील दोन प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि अली अल सालेम व अहमद अल जबर हवाई तळांवर इराणने हल्ले केले. हे तळ अमेरिकन हवाई दलाच्या हालचालींसाठी महत्त्वाचे मानले जातात.
बहरीन: अमेरिकन नौदलाचे मुख्यालय लक्ष्य
इराणने जुफैर जिल्ह्यात ड्रोन हल्ले करून अमेरिकन नौदलाच्या पायाभूत सुविधांवर प्रहार केला. मनामा शहरातील काही हॉटेल व इमारतींनाही झळ बसली.
तेल आणि गॅसच्या दरात उसळी; भारतीय बाजारावर परिणाम
इराणच्या हल्ल्यामुळे ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल ११८ डॉलर्सवर पोहोचले, तर युरोपमधील नैसर्गिक वायूचे दर एका दिवसात १७% वाढले. सेन्सेक्स ३.२६% नी घसरून ७४,२०७.२४ वर बंद झाला, तर निफ्टी २३,००२.१५ वर बंद झाला. या घसरणीमुळे भारतातील गुंतवणूकदारांची तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा झाली आहे.
जागतिक बाजारावर परिणाम
आशियातील कोस्पी, निक्केई, शांघाय आणि हँगसेंग निर्देशांक घसरले. युरोपियन बाजारातही मोठी घसरण झाली आहे, तर अमेरिकेतील बाजार बुधवारी कोसळले होते. जागतिक महागाई, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि जपानच्या मध्यवर्ती बँकेच्या कडक धोरणामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण
जागतिक कमॉडिटी बाजारात विक्रीमुळे सोने ७,००० रुपये आणि चांदी १७,८०० रुपये स्वस्त झाले. चांदीच्या दरात जानेवारी ३ रोजीच्या ४,०४,५०० रुपयांच्या उच्चांकापासून ४१% नी, तर सोन्यात १६.२३% नी घसरण झाली आहे.
इस्रायल-इराण संघर्षाने खाडी परिसरातील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून थेट जागतिक बाजारावर आणि भारतातील शेअर बाजारावर मोठा फटका दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर युद्ध वाढले तर ऊर्जा संकट, जागतिक महागाई आणि बाजारातील अस्थिरता अधिक गंभीर होऊ शकते.










