जळगाव – राज्यात उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकूल वातावरणात ( इज ऑफ डुईंग बिझिनेस ) चालना मिळण्यासाठी गुरुवार, दि 16 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता दि जळगांव दाल मिल ओनर्स असोसिएशन कार्यालय सभागृह, मार्केट यार्ड, अजिंठा रोड, जळगाव येथे उद्योग संचालनालय मुंबई / मैत्रीमार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत आयटी पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या व शासनाने राबविलेल्या विविध सुधारणांविषयी इज ऑफ डुईंग बिझिनेस व मैत्री मुंबई येथील कार्यरत अधिकारी श्रीमती आरुषी सक्सेना व श्रीमती रीना रोशन मिरांडा सादरीकरण करणार आहेत.
या कार्यशाळेसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, उद्योजक, सनदी लेखापाल, सनदी वास्तू रचनाकार, इंजिनियर्स तसेच उद्योग व्यवसायाशी संबंधित सर्व शासकीय विभागांचे जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन साहेबराव पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले आहे .













