Bajaj Allianz Cashless सेवा १ सप्टेंबरपासून बंद होण्याच्या AHPI च्या इशाऱ्यानंतर कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना दिलासा देत थेट हॉस्पिटल बिल भरण्याची हमी Bajaj Allianz ने दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज -: आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं प्रकरण काय?
देशभरातील आरोग्य विमा क्षेत्रात मोठा वादंग निर्माण झाला आहे. Association of Healthcare Providers India (AHPI) ने १ सप्टेंबरपासून Bajaj Allianz General Insurance च्या ग्राहकांसाठी cashless hospitalisation सेवा थांबवण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर विमाधारकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र आता कंपनीने थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे भरण्याचा निर्णय घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
Bajaj Allianz ची थेट पेमेंट योजना
देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी असलेल्या Bajaj Allianz ने स्पष्ट केले की, कोणत्याही ग्राहकाला रुग्णालयात कॅशलेस सेवा नाकारली गेल्यास त्याला थेट विमा कंपनीकडून रुग्णालयीन खर्चाची रक्कम मिळेल.
कंपनीचे CEO तपन सिंघेल यांनी सांगितले, “आजवर एकही कॅशलेस दावा नाकारला गेला नाही. तरीही जर अशी वेळ आली तर ग्राहकाला आधी आम्ही रक्कम देऊ. कुणालाही त्रास होणार नाही.”Bajaj Allianz Cashless

कंपनी सध्या मोटर विमा दाव्यांसाठी वापरले जाणारे direct settlement मॉडेल आता आरोग्य विम्यांतही लागू करण्याच्या तयारीत आहे. यात ग्राहक ऑनलाईन कागदपत्रे व फोटो अपलोड करून दावा करू शकेल.Bajaj Allianz Cashless
२५ हजार रुग्णालयांशी टाय-अप
Bajaj Allianz ने FY26 च्या जुलैअखेरपर्यंत ₹2,202 कोटींचा आरोग्य विमा प्रीमियम गोळा केला असून, देशभरातील जवळपास २५,००० रुग्णालयांशी कंपनीचे करार आहेत. अशा वेळी AHPI च्या निर्णयामुळे हजारो ग्राहकांवर परिणाम होण्याची भीती होती.Bajaj Allianz Cashless
महत्वाचे :- Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
महत्वाचे :- Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
General Insurance Council चे वक्तव्य
General Insurance Council (GIC) ने AHPI च्या पावलावर टीका केली आहे.”कॅशलेस सुविधा रोखल्याने सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होईल. यामुळे रुग्णालयीन उपचारासाठी आधी मोठी रक्कम भरावी लागेल, जी अनेक कुटुंबांसाठी अशक्यप्राय ठरू शकते. गंभीर आजारांमध्ये तर जीव धोक्यात येईल,” असे GIC ने स्पष्ट केले.
उद्योगातील अलीकडचे तणाव
गेल्या काही दिवसांत इतर काही विमा कंपन्या आणि रुग्णालयांमध्येही अशा तणावाचे प्रसंग झाले होते. मात्र चर्चेअंती त्यावर तोडगा निघाला. त्यामुळेच Bajaj Allianz आणि AHPI यांच्यातील वाद लवकरच मिटण्याची आशा व्यक्त केली जात आहे.Bajaj Allianz Cashless
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर

ग्राहकांचा दिलासा कायम
Bajaj Allianz ने दिलेला हा थेट पेमेंटचा पर्याय सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण,रुग्णालयीन खर्चाचा तातडीचा भार टळणार,गंभीर परिस्थितीत वेळ वाचणार,ग्राहकाचा विश्वास टिकून राहणार
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!
आरोग्य विमा ही सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक सुविधा बनली आहे. AHPI आणि विमा कंपन्यांमधील वादात ग्राहक बळी पडू नयेत, यासाठी Bajaj Allianz ने उचललेले हे पाऊल आश्वासक आहे. आता दोन्ही पक्षांत तोडगा निघून आरोग्य सेवांतील कॅशलेस यंत्रणा पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
AHPI म्हणजे काय?
देशभरातील रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांचे प्रतिनिधित्व करणारी Association of Healthcare Providers India (AHPI) ही एक महत्त्वाची संघटना आहे. खासगी, ट्रस्ट, कॉर्पोरेट आणि मध्यम आकाराच्या हॉस्पिटल्सना एकत्र आणून रुग्णांच्या उपचारात पारदर्शकता, दर्जा आणि सेवा सुधारण्याचे काम ही संस्था करते. विमा कंपन्या, सरकार आणि आरोग्य क्षेत्रातील धोरणात्मक चर्चांमध्ये AHPI सक्रिय सहभाग घेते.
मात्र, विमा कंपन्या आणि रुग्णालयांमध्ये दर व पेमेंट पद्धतींवर मतभेद निर्माण झाले की, AHPI आपल्या सदस्य रुग्णालयांच्या हितासाठी ठाम भूमिका घेताना दिसते. याच कारणामुळेच AHPI ने १ सप्टेंबरपासून Bajaj Allianz General Insurance च्या ग्राहकांसाठी cashless सेवा स्थगित करण्याचा इशारा दिला होता. या निर्णयामुळे हजारो विमाधारकांना अचानक मोठा आर्थिक भार सहन करावा लागेल अशी भीती निर्माण झाली होती.Bajaj Allianz Cashless
ग्राहकांनी अधिकृत माहिती, पॉलिसी डिटेल्स, दावा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन किंवा Bajaj Allianz Cashless सेवा संदर्भातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी थेट https://www.bajajallianz.com या वेबसाईटला भेट द्यावी. येथे सर्व प्रकारच्या हेल्थ, मोटर आणि इतर विमा पॉलिसींबाबत माहिती तसेच cashless claim process ची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
धक्कादायक बातमी: गर्लफ्रेंडचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला ;गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला ; प्रेमविवादातून थरार!
शॉकिंग न्यूज : चुलत भावाचे बहिणीवर जळलं प्रेम, तीने नकार दिल्याने निर्घृण हत्या करून घरातचं पुरलं!
हे पण वाचा : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना
शॉकिंग न्यूज : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला!
हे पण वाचा –शिर्डीत वेश्या व्यवसाय प्रकरणी चार हॉटेल्स वर्षभरासाठी सील
Crime News: तरुणीला ६ महिने बंदिस्त ठेवून आळीपाळीने लैंगिक अत्याचार ; धक्कादायक घटना
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
BSF सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !
5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी