Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. एकनाथ खडसेनीं शेतकऱ्यांसाठी विधानपरिषदेत केली ‘ही’ मागणी

najarkaid by najarkaid
July 6, 2024
in Uncategorized
0
भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर ; एकनाथ खडसेंच्या संवादचा व्हिडीओ तुफान व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

शेतकरी बांधवांची तूर खरेदी करताना काही व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकरी बांधवांची लूट करत असल्याबाबत आज (दि.५) आ .एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला.

यावेळी ते म्हणाले की, तूर खरेदीसाठी शासनाने ठरविलेल्या आधारभूत किंमतीपेक्षाही काही व्यापारी, संस्था शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी करतात. यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे. अशा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर शासन गुन्हे दाखल करणार काय? असा प्रश्न उपस्थित करून राज्यात नेमकी किती तूर खरेदी केंद्रे सुरु आहेत? आणि शेतकरी उत्पादक कंपनीला तूर खरेदीची परवानगी देताना ठराविक तूर खरेदीची मर्यादा घातली जाते, ती मर्यादा संपल्यानंतर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची अडचण होते. त्यामुळे ती मर्यादा काढून टाकावी आणि ज्या ठिकाणी खरेदी विक्री सहकारी संघ तूर खरेदीसाठी सक्षम असतील आणि त्यांनी परवानगी मागितली तर तूर खरेदी करण्यासाठी खरेदी विक्री संघांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी केली.

यावर कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, शासनाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची मर्यादा घालून देण्यात आली असली, तरी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणल्यास सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल. १५३ शासकीय तूर खरेदी केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आले होते. खरेदी विक्री संघ ही शासनाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे जो खरेदी विक्री संघ शासनाच्या सर्व अटीशर्तींच्या अधीन राहून तूर खरेदी करण्यासाठी सक्षम असेल त्यांचे डी.डी.आर. कडून प्रस्तावमागवण्यात येतील आणि त्यावर निर्णय घेण्यात येईल असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

बोदवड तालुक्याला डार्क झोन मधून वगळण्यात यावे- एकनाथराव खडसे
बोदवड तालुक्याचा समावेश डार्क झोन मध्ये असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही त्यामुळे बोदवड तालुक्याला डार्क झोन मधून वगळण्यात यावे अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये केली. यावेळी आ एकनाथराव खडसे म्हणाले जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील जवळपास सर्वच गावांचा डार्कझोन मध्ये समावेश आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विंधन विहिर साठी मिळणारे अनुदान मिळत नाही त्याचप्रमाणे इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

तालुक्यातील गावांचे बऱ्याच वर्षांपूर्वी भुजल सर्वक्षण झाले होते त्याआधारावर तालुक्याचा डार्क झोन मध्ये समावेश करण्यात आला होता परंतु आता पुष्कळ कालावधी उलटला तरी भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झालेले नाही जलयुक्त शिवार योजनेत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवले गेले. त्यामुळे भूगर्भातील जलपातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बोदवड तालुका डार्कझोन मधून वागळण्याच्या संदर्भात पुन्हा एकदा भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून हा तालुका डार्कझोन मधून वागळण्यात यावा अशी आग्रही मागणी आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Shubhmangal Vivah Yojana ; मुलींच्या लग्नाला शासनाकडून १० हजाराची आर्थिक मदत

Next Post

12 वर्षीय विद्यार्थिनीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न आरोपीस अटक

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
12 वर्षीय विद्यार्थिनीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न आरोपीस अटक

12 वर्षीय विद्यार्थिनीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न आरोपीस अटक

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us