बॉलिवूड स्टार्स अनेकदा त्यांच्या लग्नामुळे आणि ब्रेकअपमुळे चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये सेलिब्रिटींमध्ये घटस्फोटाच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे कोणत्या सेलिब्रिटींचे ब्रेकअप कधी होईल हे सांगणे कठीण आहे. आता ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चन याला घटस्फोट देणार आहे हे खरे आहे की केवळ अफवा आहे?हे अद्याप स्पष्टपणे सांगता येणारं नसलं तरी ऐश्वर्याने बच्चन कुटुंबीयांचे घर सोडून आईकडे मुक्काम ठोकला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
बॉलीवूडमधली सर्वात सुंदर जोडी असे बिरुद असलेल्या अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात गेल्या काही वर्षांपासून धुसफूस सुरू बातम्या होत्या मात्र, एका मर्यादित वर्तुळापर्यंत राहिलेली ही कुजबुज आता चव्हाट्यावर आली आहे.
ऐश्वर्याने बच्चन कुटुंबीयांचे घर सोडून आईकडे मुक्काम ठोकला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याचीही चर्चा आहे. उभयतांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरु होता. मात्र, मुलगी आराध्यामुळे दोघेही आजवर एकत्र राहात होते.
अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांमध्ये दुरावा वाढत चालला होता. त्यातच सासू जया बच्चनशी गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्याचा अबोला होता.अमिताभ यांनी त्यांचा पहिला बंगला ‘प्रतीक्षा मुलगी श्वेता नंदा हिच्या नावाने करताच अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील वाद घटस्फोट पर्यंत येउन पोहचला आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सुनेला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यावर ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. अभिषेक आणि ऐश्वर्याचे २० एप्रिल २००७ रोजी लग्न झाले होते. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला. त्यांची मुलगी आराध्याचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी झाला.
केवळ त्यांच्या मुलीमुळेच ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. प्रदीर्घ मैत्रीनंतर दोघांनीही एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले. दोघांनी ‘गुरू’, ‘धूम 2’ सारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघांमधील मतभेदांच्या बातम्या खोट्या असल्याचं समजतं, कारण ते एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते.ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबाचे घर सोडले असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री तिचा दिवसभराचा वेळ तिची आई आणि बच्चन कुटुंबात वाटून घेते. जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात अनेक समस्या असल्याची अफवा आहे.