तुमच्या बँक खात्यात पैसे नाहीत आणि तुम्हाला काही पैसे हवे आहेत तर अशावेळी तुम्ही तुमच्या पैसे नसलेल्या बँक खात्यातून थेट १० हजार रुपया पर्यंत रक्कम (withdraw without funds from Account ) काढू शकता…. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या बँक खात्यात पैसे नसतांना १० हजार रुपयापर्यंत पैसे विड्रॉल कसे काय होतील आणि बँक कॅशिअर खरंच तुम्हाला पैसे नसलेल्यातुमच्या खात्यातून १० हजार रुपये काढून देईल का तर या प्रश्नाचं उत्तर होय आहे. आम्ही तुम्हाला केंद्रातील मोदी सरकारने सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री जन धन’ Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY) योजने बाबत माहिती देणारं आहोत.
‘प्रधानमंत्री जन धन’ योजने अंतर्गत बँक खाते (bank account open) उघडण्या (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY)त आले आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे,प्रधानमंत्री जन धन’ योजने अंतर्गत काढलेले खाते उघडण्यामागचा उद्देश देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीने देखील बँकिंग सुविधांचा वापर करावा हा होता आणि तो उद्देश सफल होतांना दिसत आहे.
केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक सरकारी योजनांचे लाभ याच अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केले जातात. यासोबतच ग्राहकांना काही खास सुविधा देखील देण्यात येतात. ‘ओव्हरड्राफ्ट‘(Overdraft)ही देखील यापैकीच एक सुविधा आहे. यामध्ये खात्यात काहीच पैसे(amount)नसताना देखील ग्राहकाला आपल्या बँकेतून १० हजार रुपये पर्यत पैसे काढता येतात.
बँकेच्या या ‘ओव्हरड्राफ्ट’ (Overdraft) योजनेत १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम (amount) काढता येते. कोणत्याही अटीशर्थींशिवाय तुम्ही यातून २ हजार रुपये सहज काढू शकता. यासाठी ग्राहकाची वयोमर्यादा आधी ६० वर्षे होती. मात्र, आता ती वाढवून ६५ वर्षे करण्यात आली आहे. तर, ‘ओव्हरड्राफ्ट’(Overdraft)ची मर्यादा देखील ५ हजारांवरून १० हजार करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्री डॉ. भागवत किसनराव कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२३पर्यंत जन धन योजनेअंतर्गत एकूण ५१.०४ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २,०८,८५५ कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत एकूण ४.०३ कोटी जन धन योजनेच्या खात्यांमध्ये शून्य रक्कम ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY) खोलण्यात आलेल्या या खात्यांमध्ये ग्राहकांना ‘हा मोठा लाभ मिळतो.
सरकारी आकडेवारीनुसार पंतप्रधान जन धन योजने Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY) अंतर्गत खोलण्यात आलेल्या खात्यांमधील ५५.५% बँक खाती ही महिलांची आहेत. तर, ६७% बँक खाती ही ग्रामीण आणि उपनगरातील क्षेत्रांमधील आहेत. या खात्यांसाठी ३४ कोटी ‘रूपे कार्ड’ कोणत्याही फी शिवाय जारी करण्यात आले आहेत. या ‘रूपे कार्ड’च्या वापरकर्त्यांना २ लाख रुपयांचा ‘अपघाती विमा’ देखील देण्यात आला आहे.
इतर बातम्या…
पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन ‘गौरव’ ने केले ‘नापाक’ कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष