मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई विमानतळावर मुसळधार पावसामुळे येथे एक खाजगी चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरल्याचे वृत्त ANI वृत्तसंस्थेने ट्विट करून दिली असून अद्याप जीवितहानी झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही. या खाजगी विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर होते.डिजिसीएने दिलेल्या माहितीनुसार, VSR Ventures Learjet 45 विमान VT-DBL विशाखापट्टणमहून मुंबईला उड्डाण करत मुंबई विमानतळावर धावपट्टी २७ वर लँडिंग करताना धावपट्टीवर कोसळलं आणि अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
#WATCH | VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL operating flight from Visakhapatnam to Mumbai was involved in runway excursion (veer off) while landing on runway 27 at Mumbai airport. There were 6 passengers and 2 crew members on board. Visibility was 700m with heavy rain. No… pic.twitter.com/KxwNZrcmO5
— ANI (@ANI) September 14, 2023
मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील दृश्यमानता ७०० मीटर होती त्यामुळं हे खाजगी चार्टर्ड विमान लँडिंग करत असताना कोसळल्याची माहिती आहे.सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.