मुंबई- कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 15 पैकी 12 जागा जिंकून विधानसभेत पूर्ण बहुमत मिळविल्याबद्दल सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, माजी आमदार राज पुरोहित, भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.














