मुंबई – पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. विशेष पीएमएलए न्यायालयानं आज हा निर्णय दिला.
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) नीरव मोदीविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयात खटला दाखल केला आहे. वारंवार समन्स बजावूनही नीरव न्यायालयीन कार्यवाहीला सामोरा जात नसल्याने त्याला नव्या कायद्यान्वये ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ घोषित करावे, अशी विनंती ईडीनं अर्जाद्वारे केली होती. ईडीचा अर्ज मान्य करतानाच, न्यायालयानं नीरव मोदीला परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं. आता न्यायालयाच्या परवानगीनं ईडीद्वारे मोदीची संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.















