Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राधाकृष्ण विखेपाटील , शेलारांसह  १३ नव्या चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी 

najarkaid live by najarkaid live
June 16, 2019
in राज्य
0
राधाकृष्ण विखेपाटील , शेलारांसह  १३ नव्या चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी 
ADVERTISEMENT
Spread the love

राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिली मंत्रिपदाची शपथ 
मुंबई : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये १३ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. 

लोकसभा निवडणुकीवेळी मुलगा सुजय यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज थेट मंत्रिपदाच्या ‘गिफ्ट’सह भाजपात प्रवेश झाला आहे. मुंबईत भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे अॅड. आशिष शेलार यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांच्या गळ्यातही कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. सावंत हे शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.

नवे कॅबिनेट मंत्री -राधाकृष्ण विखे पाटील ,आशिष शेलार ,संजय कुटे ,सुरेश खाडे ,डॉ. अनिल बोंडे ,डॉ. अशोक उईके ,जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) ,तानाजी सावंत (शिवसेना)
नवे राज्यमंत्री- योगेश सागर ,अतुल सावे ,संजय उर्फ बाळा भेगडे ,परिणय फुके ,अविनाश महातेकर

मेहतांसह ‘या’ मंत्र्यांना डच्चू
मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिपद गमवावे लागले आहे. याशिवाय आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मंत्री भाजपचे आहेत. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिंपरी चिंचवड येथे पतींनी मारल्या वडाला फेऱ्या 

Next Post

सुवासिनींनी मागितले सौभाग्यासह पर्यावरणपूरक जीवनाचे दान  

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
सुवासिनींनी मागितले सौभाग्यासह पर्यावरणपूरक जीवनाचे दान  

सुवासिनींनी मागितले सौभाग्यासह पर्यावरणपूरक जीवनाचे दान  

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us