Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्ता संघर्षात ‘जलयुक्त शिवार’ योजनेला ब्रेक

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in राज्य
0
सत्ता संघर्षात ‘जलयुक्त शिवार’ योजनेला ब्रेक
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटला नसून त्याचा परिणाम मागील भाजप सरकारच्या योजनांवर पहायला मिळत आहे. मागील भाजप सरकारची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना गुंडाळण्यात आली आहे. राज्यात सरकारच नसल्याने पुढील वर्षासाठी या योजनेअंतर्गत नवीन गावांची अद्याप निवड करण्यात आली नसून त्यासाठी आराखडा व आर्थिक नियोजन देखील करण्यात आले नाही. एकूणच जलयुक्त शिवार योजना गुंडाळण्यात आल्याचे समजते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना होती. त्या अंतर्गत जिल्ह्यात गावांची निवड करुन त्या ठिकाणी ‘पाणी आडवा व पाणी जिरवा’ ही संकल्पना राबविण्यात आली. पाणी साठविण्यासाठी मोठी अथवा मध्यम स्वरुपाची धरणे बांधण्याऐवजी छोटे व लघु बंधारे बांधून त्याद्वारे पाणी संचय करुन शिवार जलयुक्त करणे हा योजनेचा उद्देश होता. त्या माध्यमातून जमिनीची भूजल पातळी वाढविणे व महाराष्ट्र टँकरमुक्त करणे हे ध्येय होते.

या योजनेवर मागील चार वर्षात कोटयवधीचा निधी खर्च झाला. जिल्हा परिषद,आदिवासी विभाग, वनविभाग माध्यमातून जिल्ह्यात ही योजना राबविली जात होती. राज्यात अनेक ठिकाणी या योजनेला मोठया प्रमाणात यश आले. तर काही ठिकाणी निकृष्ट कामे व भ्रष्टाचारामुळे ही योजना सत्ताधारी भाजपसाठी डोकेदुखी ठरली. जिल्हयात देखील जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. मात्र, सद्यस्थितीत राज्यात सत्ता स्थापनेचे घाेंंगडे भिजत पडले आहे.

राज्याला नेतृत्व नसल्याने विकास कामे जवळपास ठप्प झाले आहेत. मागील सरकाच्या अनेक महत्वकांक्षी योजना आराखडा व निधी अभावी ठप्प पडल्या आहेत. पुढील 2020 – 2021 या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून अद्याप जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावांची निवड झाली नाही. तसेच, या योजनेचा आर्थिक आराखडा देखील तयार करण्यात आला नाही. त्यात राज्यात सत्ता परिवर्तन झाले तर ही योजना बासनात गुंडाळली जाण्याची चिन्हे आहेत.

जलयुक्तची 120 कामे ठप्प
जलयुक्त शिवार योजनेंतअर्तगत मागील वर्षाच्या आराखड्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असली तरी 120 कामे सद्यस्थितीत ठप्प आहे. योजनेचे 45 कोटींचा निधी तसाच पडून आहे. अनेक बंधारे गाळमुक्त करुन त्यांची जलसंचय क्षमता वाढवायची आहे. मात्र, यंदा चांगला पाऊस झाल्याने या बंधार्‍यांमध्ये पाणी भरलेले आहे. पुढील मार्च महिन्यात त्यातील पाणी आटल्यानंतर गाळमुक्त व डागडुजीची कामे हाती घेतली जाणार आहे.

जिल्ह्यात जलयुक्तची 45 कोटींची 120 कामे ठप्प आहे. पुढील वर्षासाठी अद्याप शासनाकडून गावांची निवड झाली नसून आर्थिक आराखडा देखील आम्हाला प्राप्त झाला नाही.
– पल्लवी निर्मळ, रोहयो उपजिल्हाधिकारी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस साजरा

Next Post

कॅन्टोंमेंट निवडणुकीपूर्वी भिंगारचा पाणी प्रश्‍न सोडवा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
कॅन्टोंमेंट निवडणुकीपूर्वी भिंगारचा पाणी प्रश्‍न सोडवा

कॅन्टोंमेंट निवडणुकीपूर्वी भिंगारचा पाणी प्रश्‍न सोडवा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us