Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

आपण करूया महाराष्ट्र AI रेडी : पत्रकार परिषदेत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) चे उत्तर महाराष्ट्र समन्वयक संतोष बिरारी यांची माहिती

najarkaid by najarkaid
July 11, 2026
in जळगाव
0
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास
ADVERTISEMENT

Spread the love

MKCL च्या रौप्यमहोत्सवी वर्षात MS-CIT ला प्रतिष्ठित SKOCH Award; AI-सक्षम MS-CIT, 265+ KLiC कोर्सेस आणि सर्वांसाठी मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

जळगाव, (नजरकैद न्यूज) – गेल्या अडीच दशकांत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) ने तब्बल 1.7 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना MS-CIT च्या माध्यमातून डिजिटल साक्षर केले आहे. रौप्यमहोत्सवी (25 वर्षपूर्ती) वर्षाचे औचित्य साधून MKCL ने “आपण करूया महाराष्ट्र AI रेडी” ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत AI-सक्षम नवीन MS-CIT कोर्स, 265 हून अधिक KLiC व्यावसायिक कोर्सेस आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास उपलब्ध करून देण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर MS-CIT या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित SKOCH Award मिळाल्याने या मोहिमेला विशेष बळ मिळाले आहे.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) चे उत्तर महाराष्ट्र समन्वयक संतोष बिरारी, जळगाव जिल्हा समन्वयक राहुल बाविस्कर आणि उमाकांत बडगुजर यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

MS-CIT ला प्रतिष्ठित SKOCH Award
MKCL च्या MS-CIT या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रमाला Digital Literacy श्रेणीत प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे. डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरण क्षेत्रातील गेल्या 25 वर्षांतील उल्लेखनीय कार्याची ही राष्ट्रीय स्तरावरील दखल आहे.

या पुरस्काराबद्दल MKCL चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी सांगितले की, हा पुरस्कार कोट्यवधी विद्यार्थी, पालक, हजारो प्रशिक्षण केंद्रे, प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स, MSBTE, MKCL परिवार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त योगदानाचा सन्मान आहे.
‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ मोहीम
23 जून 2026 पासून सुरू झालेली ही राज्यव्यापी मोहीम 60 दिवस चालणार असून, महाराष्ट्रभरातील अधिकृत MKCL प्रशिक्षण केंद्रांमार्फत शाळा, महाविद्यालये आणि निवासी भागात AI विषयी जनजागृती केली जात आहे.
या मोहिमेचा मुख्य आकर्षण म्हणजे मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास. www.mscit.ai⁠� या संकेतस्थळावर नोंदणी करून कोणताही नागरिक हा मास्टरक्लास विनामूल्य करू शकतो.

हा मास्टरक्लास विशेषतः:
शालेय विद्यार्थी
महाविद्यालयीन विद्यार्थी
पालक
शिक्षक
शासकीय कर्मचारी
व्यावसायिक आणि नोकरदार
यांच्यासाठी उपयुक्त आहे.
मास्टरक्लास पूर्ण करणाऱ्यांना MS-CIT केंद्रामार्फत आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येणार असून, पुढील मार्गदर्शन व प्रवेशासाठी जवळच्या MS-CIT केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
AI-सक्षम नवीन MS-CIT
बदलत्या तंत्रज्ञानाच्या गरजा लक्षात घेऊन MS-CIT अभ्यासक्रमात Artificial Intelligence (AI), Cyber Security, Data Literacy आणि Cloud Computing यांचा समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थी ChatGPT, Microsoft Copilot, Google Gemini, Canva AI यांसह 125 हून अधिक AI टूल्स आणि 250 हून अधिक आधुनिक डिजिटल कौशल्ये प्रत्यक्ष वापरातून शिकतात.
याशिवाय ERA KRANTI हा AI-आधारित पर्सनलाइज्ड चॅटबॉट विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यान शंका निरसनाची सुविधा उपलब्ध करून देतो.

CCTP टायपिंग कोर्सची सुविधा
MS-CIT विद्यार्थ्यांसाठी Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) हा अभ्यासक्रम उपलब्ध असून, इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये Remington कीबोर्ड लेआउटवर टायपिंगचे प्रशिक्षण दिले जाते. अंतिम परीक्षा MSBTE घेत असून, यशस्वी विद्यार्थ्यांना MSBTE व MKCL यांचे संयुक्त प्रमाणपत्र दिले जाते.
सर्वांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम
MS-CIT हा कोर्स 8 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपासून पालक, गृहिणी, शिक्षक, नोकरदार, उद्योजक आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. AI, Data Science, Digital Marketing, स्पर्धा परीक्षा आणि स्वयंरोजगारासाठी हा कोर्स महत्त्वाचा ठरतो.
265 हून अधिक KLiC व्यावसायिक कोर्सेस
MS-CIT सोबतच MKCL तर्फे 265 हून अधिक KLiC (Knowledge Lit Career) रोजगाराभिमुख कोर्सेस उपलब्ध आहेत.
Back Office, Financial Accounting, Digital Designing, Data Science, IT Hardware, Networking, Cyber Security, Software Development, Tally with GST, Advanced Excel, Graphic Designing, Web Designing यांसारख्या विविध क्षेत्रांतील 30, 60, 90 आणि 120 तासांचे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

120 तासांचे कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना MKCL प्रमाणपत्रासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यताप्राप्त गुणपत्रिका दिली जाते. तसेच तीन KLiC कोर्स पूर्ण केल्यास KLiC Diploma प्रमाणपत्रही प्रदान केले जाते.
प्रवेश सुरू
महाराष्ट्रातील 5,000 हून अधिक अधिकृत MKCL प्रशिक्षण केंद्रांवर MS-CIT, CCTP आणि KLiC कोर्सेससाठी प्रवेश सुरू असून, “आपण करूया महाराष्ट्र AI रेडी” या मोहिमेत सहभागी होऊन मोफत AI मास्टरक्लासचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL), पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
Tags: #AIEducation#AIMasterclass#AIReadyMaharashtra#ArtificialIntelligence#CareerSkills#CloudComputing#CyberSecurity#DataLiteracy#DigitalLiteracy#DigitalSkills#Education#FreeAICourse#KLiC#Maharashtra#MaharashtraAIReady#MKCL#MSCIT#NajarKaid#SkillDevelopment#SKOCHAward
ADVERTISEMENT
Previous Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

Next Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us