Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक लढवण्यास बंदी?

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक लढवण्यास बंदी?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  राजकारणाचं होणारं गुन्हेगारीकरण रोखण्याच्या सातत्याने होणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक बंदी घालण्याबाबतचा निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायामूर्ती बी. आर. गवई यांच्या पीठाने हे आदेश दिले. भाजप नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या जनहित याचिकेवर विचार करण्यास नकार देतानाच कोर्टाने हे आदेश दिले आहेत. 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी तरतूद करण्याची मागणी करणारी याचिका अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर कोर्टाने उपाध्य यांच्या अर्जावर तीन महिन्याच्या आत विचार करा आणि त्यासंदर्भात विस्तृत आदेश पारित करा, असे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. दरम्यान, २१ जानेवारी रोजी अशाच प्रकारची एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून याचिकाकर्त्यांना निवडणूक आयोगासमोर आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळीही कोर्टाने आयोगाल या संदर्भात योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. तसेच या याचिकेलाच अर्ज समजून त्यावर गंभीरपणे विचार करण्यास आयोगाला सांगण्यात आले होते.

निवडणूक आयोगाने कोणतीच कारवाई न केल्याने नवीन याचिका सादर करावी लागल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला होता. राजकीय पक्षांनी गंभीर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, तसे आदेशच कोर्टाने आयोगाला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उपाध्याय यांनी याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, २००९च्या लोकसभा निवडणुकीत ७८१० उमेदवार उभे होते. त्यापैकी ११५८ उमेदवारांनी म्हणजे १५ टक्के उमेदवारांनी त्यांच्यावरील गुन्हेगारीची माहिती दिली होती. त्यापैकी ६१० म्हणजे ८ टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत उभे असलेल्या ८१६३ उमेदवारांपैकी १३९८ उमेदवारांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती दिली होती. त्यापैकी ८८९ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा निर्यात अशक्य

Next Post

सत्ता स्थापनेच्या पार्श्‍वभूमिवर खबरदारी ; पोलीस दलातर्फे जळगावात पथसंचलन

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
सत्ता स्थापनेच्या पार्श्‍वभूमिवर खबरदारी ; पोलीस दलातर्फे जळगावात पथसंचलन

सत्ता स्थापनेच्या पार्श्‍वभूमिवर खबरदारी ; पोलीस दलातर्फे जळगावात पथसंचलन

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us