भगुर- येथील मिनार मस्जिद या ठिकाणी किराणा दुकानात स्फोट झाल्याने इमारतीचे बांधकाम कोसळले. यामध्ये उभ्या असलेल्या रिक्षाचे नुकसान झाले असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती मिळते आहे.
भगूर येथील आसिफ शेख यांच्या किराणा दुकानात रात्रीच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. यामध्ये इमारतीचे बांधकाम ढासळल्याने किराणा दुकानाचे नुकसान झाले असून बाजुला उभ्या रिक्षाचे हीनुकसान झाले, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.













