बीड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतनाचा वर्षाव केला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना वाढदिवसानिमित्त दैनिक लोकसत्ता कार्यालयात रविवार दि. 1 जानेवारी रोजी विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन अभिष्टचिंतन केले. केक कापून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत भावी निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. आपल्या हातून पत्रकारांच्या आर्थिक हितासह उपेक्षित, पिडीत, वंचित घटकाला लेखनीतून न्याय मिळो अशा शुभेच्छा विविध मान्यवरांनी दिल्या.
यामध्ये प्रामुख्याने बांबू निर्मिती चळवळीचे प्रणेते, कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशाभाई पटेल, गंगाभीषण थावरे, पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, रमेश पोकळे, अॅड. सर्जेराव तांदळे, शुभम धुत, गोवर्धन दराडे, सरपंच परिषदेचे दत्ता काकडे, बालाजी तोंडे, वैभव स्वामी, शेखर कुमार, गुलदाद पठाण, संजय राठोड, बाबा देशमाने, इरफान शेख, चंदन पठाण, शेख वसीम, अमजद पठाण, शेख आय्युब, रईस खान, शेख ताहेर, गंगाधर काळकुटे, साईराम बँकेचे शाहीनाथ परभणे, कल्याण आखाडे, रमेश मोराळे, सुधीर देशमुख, धनंजय वाघमारे, अशोक गवळी आदिंनी प्रत्यक्ष भेटुन तर अनेकांनी भ्रमणध्वनीवर शुभेच्छा दिल्या.