ठाणे: भिवंडीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीसोबत मित्राचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरूणाने मित्राची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर त्याचे गुप्तांग कापून ते त्याच्या तोंडात कोंबले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. समीर खान (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमीर अन्सारी (29) याला अटक केली आहे
नेमकी काय आहे घटना?
भिवंडीत राहणारे समीर खान (21) व अमीर अन्सारी (29) हे बालपणापासून मित्र होते. समीर एक हॉटेल चालवायचा तर अमीर हा टेम्पो चालक होता. समीरचे एका तरुणीशी अफेयर होते. अमीर देखील एका मुलीसोबत लग्न करणार होता मात्र त्या दोघांमध्ये वाद झाल्याने त्या मुलीने त्यांचे नाते संपवले होते. त्यानंतर समीर त्या त्या मुलीशी जवळीक करू लागला होता. मात्र अमीरचे तिच्यावर प्रेम असल्याने तो संतापला होता. त्यामुळे त्याने समीरचा काटा काढायचे ठरवले.
हे देखील वाचा :
अब्दुल सत्तार आणि गुलाबरावांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सामनातून समाचार
आदित्य ठाकरे, अजित पवार अन् सुप्रिया सुळेंना नोटीस पाठवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग
सोमवारी समीर त्याच्या हॉटेलमध्ये एकटाच झोपलेला असताना अमीर रात्री दीडच्या सुमारास तिथे पोहोचला. एक दिवस समीरला एकट्यात गाठून त्याची सुऱ्याने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याने समीरचे गुप्तांग कापले व त्याच्याच तोंडात कोंबले. त्यानंतर तो तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक लोकांनी समीरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला, त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री अमीर घटनास्थळावरून पळून जाताना दिसला. त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.