जळगाव : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी तीन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकी काय आहे घटना
जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या 22 वर्षीय तरुणी 27 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात होती. यावेळी संशयीत आरोपी विजय दिलीप पाटील याने तरुणीस बोलला की, तू माझ्यासोबत चल आणि माझ्याशी संबंध ठेव नाही तर, तूला उचलून नेईल. एवढेच नव्हे तर हात ओढून तरुणीला लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी संशयीत आरोपी विजय पाटीलसह दोन तरुणांवर पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मपोनां अलका शिंदे करीत आहेत.