Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक-दोन दिवसांत महाराष्ट्राबाबत निर्णय: काँग्रेस

najarkaid live by najarkaid live
November 18, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
एक-दोन दिवसांत महाराष्ट्राबाबत निर्णय: काँग्रेस
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. या चर्चेत येत्या एक-दोन दिवसांत महाराष्ट्राबाबत पुढील निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 

शरद पवार यांनी आज दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत माहिती दिली. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीचा निर्णय झाला. त्यानुसार येत्या एकदोन दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होईल. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडवण्याबाबत पुढे कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय होईल, असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.

पवारांच्या मनात काय चाललंय?

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात सुमारे ५० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर पवारांनी आपल्या ‘६ जनपथ’ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबत माहिती दिली. पवारांची ही पत्रकार परिषद महाराष्ट्रातील सत्ताकोंडीवर संभ्रम वाढवणारी ठरली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत बैठकीत कोणतीच चर्चा झाली नाही, असे पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. सोनियांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिली व या स्थितीवर येत्या काळात आपण लक्ष्य ठेऊन राहावं, यावरही या बैठकीत एकमत झाल्याचं पवार यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजप सरकार का स्थापन करत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असेही पवार यांनी नमूद केले. पवारांच्या या विधानांनी सगळेच चक्रावून गेले आहेत. पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय, याची उत्सुकता यामुळे ताणली गेली आहे.

दिल्लीत पडद्यामागून हालचाली

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन दोन महिने होत आले तरी अद्याप सत्ताकोंडी फुटलेली नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात कोणताही पक्ष यशस्वी न ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा, यावर शिवसेना ठाम राहिल्याने भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. या स्थितीत शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक वाढली असून हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात नवा पर्याय देतील, अशी शक्यता आहे. या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठकही मुंबईत पार पडली. असे असतानाच आता महाराष्ट्रातील सत्तापेच दिल्लीत पोहचला असून तिथे काय घडतंय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पवारांनी शिवसेनेसोबत जाण्याचे कोणतेही स्पष्ट संकेत दिले नसले तरी पडद्यामागून बऱ्याच घडामोडी दिल्लीत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेचे पाचोऱ्यात 20 रोजी रास्ता रोको !

Next Post

काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर

काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर

ताज्या बातम्या

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

February 23, 2026
School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

February 22, 2026
Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us